Nagpur Crime News : नागपूर : नागपूरच्या (Nagpur News) मौदा शहरामध्ये घडलेल्या हृदय पिळवटून टाकण्याऱ्या घटनेनं आज संपूर्ण शहर हळहळत आहे. नागपुरातील मौद्यात भटक्या कुत्र्यानं तीन वर्षीय मुलावर हल्ला केला. या हल्ल्यात गंभीर जखमी झालेल्या मुलाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. त्यामुळे संपूर्ण शहरात भितीचं वातावरण पसरलं आहे. 


मौद्यात काही दिवसांपासन मौदा शहरात भटक्या कुत्र्यांनी हैदोस घातला आहे. अनेकांना चावा घेऊन जखमी केलं आहे. शहरातील विविध वस्त्यांमध्ये भटकी कुत्री फिरत असतात. लहान मुलं खेळताना त्यांच्यावर कुत्र्यांनी हल्ला केल्याच्या अनेक घटना घडल्या आहेत.
अशीच एक घटना मंगळवारी सायंकाळी मौदा शहरातील गणेश नगर येथे घडली. 


मोदा शहरात राहत असलेल्या शहाणे कुटुंबातील 3 वर्षाचा मुलगा वंश अंकुश शहाणे घराबाहेर खेळत होता. त्याच्यावर रस्त्यावर भटकणाऱ्या मोकाट कुत्र्यांनी हल्ला करून त्याच्या मानेचे आणि हाताचे लचके तोडले आणि त्याला गंभीर जखमी केलं. वंश याला लगेच मौदा येथील ग्रामीण रुग्णालयात हलवण्यात आलं. उपचारादरम्यान वंशचा मृत्यू झाला. ही घटना मंगळवारी संध्याकाळी घडली. भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यात जखमी झालेल्या वंशला तात्काळ उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. पण, उपचारा दरम्यानच अवघ्या तीन वर्षांच्या चिमुकल्या वंशनं अखेरचा श्वास घेतला. 


दरम्यान, सध्या नागपुरांसमोर भटके कुत्रे आणि त्यांचे वाढते हल्ले ही मोठी समस्या आहे. नागपुरातील मौद्यात तर भटक्या कुत्र्यांनी अक्षरक्षः हैदोस घातला आहे. भटक्या कुत्र्यानं तीन वर्षांच्या चिमुकल्या वंशवर हल्ला करुन त्याच्या मानेचे आणि हाताचे लचके तोडले आणि त्यातच चिमुकल्या वंशचा मृत्यू झाला. या घटनेनंतर संपूर्ण शहरातून हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच, भटक्या कुत्र्यांच्या वाढत्या हल्ल्यांमुळे शहरात भितीचंही वातावरण पसरलं आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


CBI पथकाकडून सीबीआय अधिकाऱ्यांनाच अटक; नेमकं काय घडलं?