Madhya Pradesh Nursing Scam:  नवी दिल्ली : ऐन लोकसभा निवडणुकांच्या (Lok Sabha Election 2024) धामधुमीत सीबीआयकडून (CBI) मोठी कारवाई करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. सीबीआयच्या पथकाकडून सीबीआय अधिकाऱ्यांना अटक करण्यात आली आहे. मध्यप्रदेशातील (Madhya Pradesh) नर्सिंग घोटाळ्याप्रकरणी सीबीआयकडून करण्यात आलेली ही सर्वात मोठी कारवाई असल्याचं सांगितलं जात आहे. केंद्रीय अन्वेषण विभागाच्या (सीबीआय) दिल्लीतील पथकानं भोपाळ सीबीआयच्या चार अधिकाऱ्यांना अटक केली आहे. याशिवाय लाच देणाऱ्या वैद्यकीय महाविद्यालयाच्या अध्यक्षालाही अटक करण्यात आली आहे.


गेल्या दोन वर्षांपासून उच्च न्यायालयाच्या आदेशावरुन सीबीआय मध्य प्रदेशातील नर्सिंग घोटाळ्याचा कसून तपास करत आहे. याचप्रकरणी 19 मे रोजी रविवारी दिल्लीतील सीबीआय अधिकाऱ्यांनी वैद्यकीय महाविद्यालयातील अधिकाऱ्यांकडून लाच घेतल्याच्या आरोपाखाली भोपाळच्या चार सीबीआय अधिकाऱ्यांना अटक केली आहे. सीबीआय पथकाकडूनच सीबीआय अधिकाऱ्यांना अटक करण्यात आल्यामुले संपूर्ण देशभरात या प्रकरणाची चर्चा रंगली आहे. तसेच, सीबीआयकडून करण्यात आलेल्या अटकेनंतर मध्यप्रदेशातील नर्सिंग घोटाळ्याला वेगळं वळण मिळालं आहे.                    


सीबीआय पथकाकडून अटक करण्यात आलेल्या सीबीआय अधिकाऱ्यांमध्ये एक सीबीआय इन्स्पेक्टर आहे, तर इतर दोन एमपी पोलीस अधिकारी आहेत जे सध्या प्रतिनियुक्तीवर सीबीआयची सेवा करत आहेत.                                                 


याशिवाय एका खासगी नर्सिंग कॉलेजचे अध्यक्ष, प्राचार्य आणि मध्यस्थ यांनाही लाच दिल्याच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींना रविवारी रात्री भोपाळ येथील विशेष सीबीआय न्यायालयात हजर करण्यात आलं, तिथून त्यांना 29 मेपर्यंत कोठडी सुनावण्यात आली आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


Lok Sabha Election 2024 : एक नाही, दोन नाही तर तरुणाचं तब्बल आठ वेळा मतदान; व्हायरल व्हिडीओनं देशभरात खळबळ, पाहा VIDEO