Nagpur Ceime News : नागपूर शहरातील (Nagpur News) शतायू कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीजमध्ये मोठा आर्थिक गैरप्रकार झाल्याचे उघडकीस आले आहे. यात चक्क महाविद्यालयातील कॅशिअरनेच विद्यार्थ्यांच्या पैशांवर डल्ला मारत लाखोंची रक्कम घेऊन पळ (Ceime News) काढला आहे. गुलशन वर्मा (वय 21, रा. गुरुदत्त हाउसिंग सोसायटी, नरेंद्रनगर) असे या कॅशिअरचे नाव असून त्याने कॉलेजच्या नावाने खोटे यूपीआय आयडी बनविले होते. त्यावर विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेशापोटी भरलेले 12 लाख 98 हजार 500 रुपये घेऊन तो फरार झाला आहे. ही घटना उघडकीस येताच महाविद्यालयातील विद्यार्थी आणि कॉलेज प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.
खोट्या यूपीआय आयडीद्वारे बळकावले विद्यार्थ्यांचे पैसे
नागपूरातील हिंगणा टी पॉइंटजवळ शतायू कॉलेज ऑफ प्रोफेशनल स्टडीज हे महाविद्यालय असून या महाविद्यालयाचे संचालक सुमूख नितेश मिश्रा (वय 46, रा.अमृत स्मृती बंगलो, बलराज मार्ग, धंतोली) हे आहेत. तर या प्रकरणातील फरार कॅशिअर गुलशन वर्मा हा मागील अनेक वर्षांपासून महाविद्यालयात अकाउंटंट आणि कॅशिअर म्हणून कार्यरत होता. त्याने कॉलेजच्या नावाने खोटे यूपीआय आयडी बनविले आणि त्या आयडीद्वारे 10 जानेवारी 2023 ते 9 मार्च 2024 यादरम्यान विद्यार्थ्यांनी शैक्षणिक प्रवेशासाठी शुल्क भरले होते. प्राप्त माहिती नुसार ही रक्कम 12 लाख 98 हजार 500 रुपये इतकी होती.
लाखोंची रक्कम घेऊन काढला पळ
2008 मध्ये सुरू झालेल्या या महाविद्यालयात एमकॉम, एमए, एमबीए, एमसीए, मास्टर ऑफ सायन्स, हे पदव्युत्तर तसेच बीकॉम, बीबीए, बीसीए आणि बीए हे पदवी अभ्यासक्रम आहेत. दरम्यान, गेल्या शैक्षणिक वर्षाच्या प्रवेशापोटी भरलेले ही रक्कम बघून गुलशनची नियत फिरली आणि त्याने महाविद्यालयातील या पैशांवर डल्ला मारण्याचा निर्णय घेतला. त्यासाठी त्याने खोट्या यूपीआय आयडीचा वापर करत त्यावर जमा झालेली संपूर्ण रक्कम स्वत:च्या फोन पे अकाउंटवर वळती केली.
त्यानंतर हा प्रकार उघडीकस येण्यापूर्वीच तो फरार झाला. कालांतराने ही बाब लक्षात येताच महाविद्यालयाचे संचालक सुमुख मिश्रा यांनी तत्काळ प्रतापनगर पोलीस ठाण्यात जाऊन या प्रकरणाची माहिती देत तक्रार दिली. त्यानंतर पोलिसांनी या प्रकरणी फसवणुकीचा गुन्हा दाखल करत त्या दिशेने पुढील तपास सुरू केला आहे. सोबतच फरार गुलशन वर्माचा देखील शोध सध्या पोलीस घेत आहेत.
इतर महत्वाच्या बातम्या