Nagpur Crime News : राष्ट्रीयकृत बँकांच्या एटीएमची हेराफेरी करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीचा पर्दाफाश करण्यात नागपूर (Nagpur Crime) पोलिसांना मोठे यश आले आहे. सावज हेरून पैसे काढण्यास मदत करण्याचा बाहण्याने संधीचा फायदा घेत एटीएम बदलून पसार होऊन नंतर त्या एटीएमच्या साह्याने पैसे काढून फसवणूक (Crime) करणाऱ्या आंतरराज्यीय टोळीच्या तिघांना अटक करण्यात आलीय. 72 तासाच्या या कारवाईत तिघांना अटक करत पोलिसांनी तब्बल 117 एटीएम कार्ड जप्त केले आहे.


नागपूरच्या अंबाझरी पोलीस आणि सायबर पोलिसांच्या मदतीने नागपूर ते प्रयाराज असे पाठलाग करत या प्रकरणी तिघांना एटीएममध्ये पैसे काढताना अटक केरण्यात आली आहे. सय्यद खान कमालुद्दीन खान (वय 38)  मो. कालीम. मो. नसीम (वय 21) वाहन चालक असलेला अलोककुमार गौतम अस अटकेतील संशयित आरोपीचा नाव असून एक आरोपी फरार आहे. सध्या पोलीस या फरार आरोपीचा शोध घेत असून पुढील तपास देखील सध्या सुरू आहे. 


नागपूर ते प्रयागराज 72 तासांचा पाठलाग


नागपुरात खाजगी कंपनीतून सेवानिवृत्त झालेले 72 वर्षीय पांडुरंग कर्वे हे रवी नगर चौकातील स्टेट बँक ऑफ इंडियाच्या एटीएम मधून पैसे काढण्यासाठी गेले होते. दरम्यान, एकाने संधी साधत  पैसे काढण्यासाठी मदतीच्या बाहण्याने पिन माहीत करून एटीएम हातोहात बदलले आणि निघून गेला. त्यानंतर कुर्वे हे घरी पोहचताच त्यांचा खात्यातून 90 हजार काढल्याचा मॅसेज आला. त्यांना हा संपूर्ण प्रकार लक्षात येताच त्यांनी तात्काळ पोलिसांकडे धाव घेतली.


तब्बल 117 एएटीएम कार्ड जप्त 


घटनेचे माहिती मिळताच पोलिसांनी तात्काळ तपास सुरू केला. दरम्यान एटीएम बदलून नागपुरच्या फ्रेंड्स कॉलनी परिसरातून 90 हजार रुपये त्यांच्या एटीएम मधून काढले आणि काही अज्ञात पसार झाल्याच माहिती हाती आली. पोलिसांनी घटनास्थळी जाऊन सीसीटीव्ही तपासून गाडीचा शोध घेतला असता यूपीतील प्रयागराजा येथून एका एटीएममध्ये सावज हेरताना त्यांना अटक करण्यात आली. यावेळी त्याच्याकडून तब्बल 117 एएटीएम कार्ड मिळून आले. सोबतच दोन कार, मोबाईल असा मुद्देमालही जप्त करण्यात आला.


हे आरोपी वेगवेगळ्या राज्यात जाऊन फसवणूक करण्यासाठी सावज शोधत असल्यानं यांनी अनेक राज्यात असे पद्धतीने फसवणूक केल्याची माहिती पुढे आली आहे. सध्या अंबाझरी पोलीस त्या दिशेने तपास करत असून यातून अनेक प्रकरण उघडकीस येण्यासची शक्यताही पोलिसांनी व्यक्त केली आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या