Nagpur Crime News : केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचा चीफ सेक्युरिटी ऑफिसर असल्याचे सांगून राजबीर चावला नावाच्या एका भामट्याने नागपुरात ठिकठिकाणी फिरून अनेक सराफा व्यापाऱ्यांना गंडविल्याचा प्रकार समोर आला आहे. यात आता पर्यंत दोन सराफा व्यापार्‍यांनी राजबीर चावलाने त्यांच्यासोबत 7 लाख 50 हजाराची फसवणूक केल्याची तक्रार पोलिसांकडे केली आहे. राजबीर चावला स्वतःला नितीन गडकरी यांचा चीफ सेक्युरिटी ऑफिसर आहे असं सांगायचा. मला तुमच्या मालकाशी बोलायचे आहे, असं सांगून तो स्वतः साठी लाखो रुपयांचे दागिने घ्यायचे आहे, असे ही सांगायचा. मात्र त्यासाठीचे पेमेंट धनादेशद्वारे करेल असे तो सांगायचा. नागपूरातील काही सराफा व्यापाऱ्यांकडून त्यांनी लाखो रुपयांचे दागिने घेऊन त्याच्या पेमेंटसाठी धनादेश सुपूर्त केले असल्याची माहिती पुढे आली आहे.


दरम्यान, नागपूरच्या एका प्रसिद्ध ज्वेलर्स दुकानामध्ये जाऊन राजबीर चावला याने ती पद्धत वापरली असता तिथल्या दुकान मालकाला शंका आली. त्याने चौकशी केली असता, राजवीर चावला नावाचा कोणताही चीफ सिक्युरिटी ऑफिसर गडकरी यांच्याकडे नाही, असे स्पष्ट झाले. आपले बिंग फुटेल हे राजवीर चावलाच्या लक्षात आल्यानंतर त्याने त्या ज्वेलर्सच्या दुकानातून लगेच पळ काढलं आणि रेल्वे स्टेशन गाठत पळ ठोकला आहे.


बिंग फुटताच काढला पळ 


मिळालेल्या माहितीनुसार, बुधवारी संध्याकाळी साडेसात वाजताच्या सुमारास तो रेल्वेने नागपुरातून पळून गेल्याचेही तपासात पुढे आले आहे. ठकबाज राजबीर चावला विरोधात सीताबर्डी आणि अंबाझरी पोलीस ठाण्यात काही सराफा व्यापाऱ्यांकडून फसवणुकीचे गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या प्रकरणातील आरोपी सध्या पसार झाल्यामुळे आता नागपूर पोलिसाचे पथक दिल्लीला जाऊन आरोपीचा शोध घेणार आहे.


इतर महत्वाच्या बातम्या