Nagpur Crime : निर्मल अर्बन बँकेचे (Nirmal Ujjwal Credit Co-Operative Society Limited) संस्थापक प्रमोद मानमोडे (Pramod Manmode), कामठी बँकेचे माजी व्यवस्थापक सचिन बोंबले आणि शैलेश कोचनकर यांच्या विरुद्ध जुनी कामठी पोलिसांनी तीन लाखांचा अपहार केल्याचा गुन्हा दाखल केला आहे. याबाबत करुणा युवराज वासनिक (रा. कळमना रोड, जुनी कामठी) यांनी तक्रार दाखल केली आहे. प्रमोद मानमोडे हे उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेतील महानगरप्रमुख पदावर आहेत. तसेच त्यांच्या सोसल मीडियावरील पोस्टमध्येही ते शिवसेना महानगरप्रमुख असा उल्लेख करतात.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार जुनी कामठी परिसरातील (Old Kamthi) रनाळा येथे राहणाऱ्या करुणा वासनिक यांच्या वडिलांच्या सेवानिवृत्तीनंतर त्यांना मिळालेल्या पैशाचे फिक्स डिपॉझिट करण्याचा सल्ला सचिन बोंबले यांनी देत निर्मल बँकेत चांगले व्यास मिळणार असल्याचे सांगितले. त्यानुसार बँकेचे कर्मचारी शैलेश कोचनकर यांनी 20118मध्ये करुणा आणि त्यांच्या वडिलांचे बँकेत बचत खाते उघडून देत चेक बुक दिले. त्यानंतर सचिन बोंबले याच्या माध्यमातून पाच लाखांची 'एफडी' (Fixed Deposite)काढून दिली. तसेच करुणा यांच्या खात्यात असलेल्या एक-एक लाख रुपयाच्या तीन एफडी आणि पन्नास हजार याप्रमाणे एकूण 3 लाख 50 हजार रुपयाच्या 'एफडी' काढल्या. मात्र, या एफडीचे मूळ प्रमाणपत्र काम असल्याचे सांगून दिले नाही.


पैसे न मिळाल्याने त्यांनी सचिन बोंबले यांचेशी संपर्क केल्यावर त्यांना दोन धनादेश दिले. मात्र, तेही बाऊंस (Dishonoured cheque) झाल्याने त्यांनी प्रमोद मानमोडे यांच्याशी संपर्क साधला. त्यांनीही सचिन बोंबले यांची संपत्ती विकून प्रत्येक महिन्यात एक लाख देण्याचे आश्वासन दिले. त्यानंतर सचिन बोंबले यांनी 6 लाखांची रक्कम परत खात्यात टाकली. मात्र, उर्वरित तीन लाख परत दिले नाहीत. त्यावरुन दिलेल्या तक्रारीवरुन जुनी कामठी पोलिसांनी चौकशी करती गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान, याबाबत पोलिसांना विचारणा केली असता, त्यांनी दुजोरा दिला. यापूर्वी नंदनवन पोलिसांनी 14 ऑगस्ट रोजी 2 कोटी 80 लाख रुपयांच्या आर्थिक अपहार प्रकरणी गुन्हा दाखल केला होता.


तक्रारदाराच्या खात्यावरही उचलले कर्ज


बँकेकडून उघडण्यात आलेल्या बचत खात्याच्या चेकबुकमधील दोन चेक नसल्याचे आढळून आले. यावेळी बँकेच्या कामाने ते घेतले असल्याची माहिती देण्यात आली. 2018मध्ये बँकेत घोटाळा (Bank Fraud) झाल्याची बाब उघड होताच माहिती घेतली असता त्यांच्या खात्यावर साडेतीन आणि साडेचार लाखाचे कर्ज घेतल्याचे दिसून आले.


इतर महत्त्वाच्या बातम्या


Rajasthan Politics : राजस्थानमध्ये राजकीय भूकंप, काँग्रेस अध्यक्षपदाच्या शर्यतीतून अशोक गेहलोत बाहेर? दिग्विजय सिंह यांचं नाव चर्चेत


Maharashtra Public Universities : ठाकरे सरकारचा आणखी एक निर्णय बदलण्याची शक्यता, मंत्रिमंडळ बैठकीत महाराष्ट्र विद्यापीठ सुधारणा विधेयक मागे घेणार?