नांदेड : पैशाच्या कारणावरून व दागिन्यांच्या मोहापायी नातसून व सून यांनी कट रचून  सासूचा खून केल्याची धक्कादायक घटना नांदेड शहरातील पावडेवाडी भागात घडली आहे.नांदेड येथील पावडेवाडी नाका परिसरात राहणाऱ्या सून आणि नातसूनेनं मिळून 70 वर्षाच्या वृद्ध चंद्रभागाबाई पुरभाजी पावडे सासूचा गळा आवळून खून केला आहे. सदर  धक्कादायक घटना काल घडली असून एका दिवसात भाग्यनगर पोलिसांनी उघडकीस आणली आहे.


 चंद्रभागाबाई पावडे असं खून झालेल्या महिलेचं नाव आहे. चंद्रभागाबाईला घसा आणि सर्दीचा त्रास होत असल्याने त्यांना नातसून व सून ह्या दोघीं उपचारासाठी दवाखान्यात नेत होत्या. चंद्रभागाबाईच्या कानातील सोन्याच्या काड्या, अंगावरील दागिने पाहून दोघींची नियत पलटली आणि तिच्या आंगावरील दागिने काढून घेत चंद्रभागाबाईचा गळा आवळून खून केला. पुरावा नष्ट करण्यासाठी गंगुबाईला पावडे वाडी नाका येथील झुडपात फेकून दिले. 


दरम्यान,चंद्रभागाबाईच्या मुलानं आई हरविल्याची तक्रार भाग्य नगर पोलिसात दिली होती. पोलिस तपासात दोघींनी कट रचून चंद्रभागाबाईचा खून केल्याचे उघडकीस आले. या वरुन दोघींच्या विरोधात भाग्यनगर पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दोघांना अटक ही केली आहे.