Crime News : तरुणाईला 'व्हेलेंटाइन डे' चे वेध लागले असताना दुसरीकडे धक्कादायक घटना समोर आली आहे. प्रेयसीकडून वारंवार होणाऱ्या मागण्यांना कंटाळून प्रियकराने तिची हत्या केली. पालघर येथील वाघोबा घाटात प्रेयसीच्या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी घटना उघडकीस आल्यानंतर काही तासांतच आरोपीच्या मुसक्या आवळल्या.
दोन दिवसांपूर्वी पालघर मनोर महामार्गावरील वाघोबा घाटात कुजलेल्या अवस्थेत एका तरुणीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली होती. हा मृतदेह कुजलेल्या अवस्थेत होता. त्यामुळे पोलिसांसमोर तपासाचे आव्हान होते. उपलब्ध असलेली माहिती आणि आढळलेल्या पुराव्याच्या आधारे आरोपींचा तातडीने शोध सुरू झाला. त्यानंतर अवघ्या 24 तासांत आरोपीला अटक करण्यात पालघर पोलिसांना यश आले. आरोपीकडून गुन्ह्याची कबुली देण्यात आली असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
पालघर पोलिसांना सांताक्रूझ येथील एक महिला बेपत्ता असून तशी तक्रार दाखल असल्याची माहिती मिळाली. या नंतर बेपत्ता महिलेचा प्रियकर झिको अन्सलीम मिस्कीत याला ताब्यात घेण्यात आले. त्याची कसून चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्याची कबुली दिली. पालघरमध्ये आढळलेला मृतदेह हा सांताक्रूझ येथील पिंकी क्लिफोर्ड मिस्कवित्ता या तरुणीचा असल्याचं उघड झालं आहे. प्रेयसीकडून वारंवार काही मागण्या होत असल्याने असल्याने त्याला कंटाळून आरोपीने ही हत्या केल्याची कबुली दिली आहे. आपला गुन्हा उघडकीस येऊ नये म्हणून आरोपीने तिचा मृतदेह पालघरच्या जंगलात आणून टाकला होता. या प्रकरणात पोलिसांनी प्रियकरासह आणखी एकाला ताब्यात घेतलं आहे. या प्रकरणी पालघर पोलीस अधिक तपास करत आहेत.
इतर महत्त्वाच्या बातम्या:
- चीड, संतापाची दोन वर्ष! हिंगणघाट जळीतकांड प्रकरण; अद्याप निकाल नाही, पोलिस चौकीची मागणीही अपूर्ण
- Pune: अभिनेता बनण्याचं स्वप्न, घरच्या परिस्थितीमुळं गॅरेजमध्ये करावं लागलं काम, नैराश्यातून तरूणाची आत्महत्या
- Pune : जीपीएसच्या मदतीने पतीच्या विवाहबाह्य संबंधाचे बिंग फोडले
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha