मुंबई : मुंबईच्या साकीनाका येथे एक महिलेने शेजाऱ्याच्या त्रासाला कंटाळून दहा वर्षाच्या मुलासह इमारतीच्या बाराव्या मजल्यावरुन उडी मारून आत्महत्या  केल्याची घटना समोर आली आहे. रेश्मा ट्रेन्चील ( 44 वर्षे ) आणि त्यांचा मुलगा  गरुड वय (10 वर्षे) असे मृत मायलेकांची नावे आहे. शेजाऱ्यांच्या त्रासाला कंटाळून हे पाऊल उचलले आहे. या घटनेने परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. पोलिसांनी या प्रकरणी एकाला अटक केली असून इतर दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.


साकीनाक्याच्या चांदीवलीच्या नाहर अमृतशक्ती येथीस टयुलिपीया इमारतीमध्ये राहत्या फ्लॅटच्या बाल्कनीमधून खाली उडी घेऊन आत्महत्या केली होती. पोलिसांना  घटनास्थळी  महिलेची 'सुसाईड नोट' मिळालीआहे. मयत महिलेने मृत्यूपूर्वी लिहिलेल्या 'सुसाईड नोट'मध्ये ती राहयल्या असलेल्या फ्लॅटच्या खालच्या फ्लॅट क्रमांक 1102 मध्ये रहाणारे इसम  मो. अयुब खान, श्रीमती शेहनाज खान आणि शादाब खान हे मयत महिलेविरुद्ध त्यांच्या घरातील वावरण्याचा आवाज येतो. म्हणून वारंवार सोसायटीकडे तसेच पोलीसांकडे तक्रार करत असल्याने त्यांच्या सदर त्रासाला कंटाळून आत्महत्या करत असल्याचे लिहिले आहे. 


या प्रकरणी शादाब अयुब खान, यास अटक करण्यात आली असुन गुन्हयाचा पुढील तपास साकीनाका पोलीस  करत आहे. मे महिन्यात आत्महत्या केलेल्या महिलेच्या पतीचे कोरोनामुळे निधन झाले होते. त्यानंतर रेश्मा नैराश्यात होत्या.  घरातून सतत आवाज येतो, अशा तक्रारी रेश्मा यांच्या विरोधात सोसायटीकडे वारंवार तक्रार केली जात आहे. याचा रेश्मा प्रचंड मानसिक त्रास होत असे.  या त्रासाला कंटाळून  आत्महत्या करत असल्याचे त्यांनी लिहिले आहे.