Kandivali Rape Case : चार वर्षीय अल्पवयीन विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार (Sexual Assault Case) झाल्याची माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. मुंबईच्या (Mumbai) कांदिवली (Kandivli) पूर्व समता नगर पोलीस ठाण्याच्या (Samata Nagar Police) हद्दीत राहणाऱ्या एका चार वर्षीय विद्यार्थिनीवर लैंगिक अत्याचार केल्याचा गंभीर प्रकार उघडकीस आला आहे. शाळेतील कर्मचाऱ्याने विद्यार्थीनीसोबत घृणास्पद कृत्य केल्याची बातमी समोर आली आहे. नराधमाने शाळेतच चिमुकलीवर अत्याचार केला. 


चार वर्षीय विद्यार्थिनीवर अत्याचार


चार वर्षीय विद्यार्थीनीवर लैंगिक अत्याचार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. शाळेतील कर्मचाऱ्याने मुलीला चॉकलेटच्या बहाण्याने बाथरूममध्ये नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचं समोर आलं आहे. याप्रकरणी पोलिसांनी पीडित मुलीच्या आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला. पीडितेच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. तसेच पोलीस या प्रकरणाचा अधिक तपास करत आहेत.


नेमकी काय घडलं?


पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कांदिवली अशोक नगर येथील लिटल कॅप्टन प्री स्कूलमध्ये शिकणारी चार वर्षीय मुलगी नेहमीप्रमाणे वडिलांसोबत 2 फेब्रुवारीला शाळेत गेली. शाळेतून पुन्हा घरी आल्यानंतर तिच्या पोटात लागल्याने आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता मुलीने सांगितलं की, शाळेचे काका तिला बाथरूममध्ये घेऊन गेले. चॉकलेटच्या बहाण्याने त्याने तिच्यावर अत्याचार केला. आईने तात्काळ पीडित मुलीला रुग्णालयात नेले, जिथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. याप्रकरणी समता नगर पोलिसांनी लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल करून आरोपीला ताब्यात घेतलं आहे, पुढील तपास सुरु आहे.


आरोपी शिपाई पोलिसांच्या ताब्यात


मुंबईच्या कांदिवली पूर्वेकडे एका खाजगी शाळेत अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचार प्रकरणी पालक आता आक्रमक झाले असून पालकांकडून शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात आले आहे. कांदिवली पूर्वेकडील लिटल कॅप्टन या खासगी शाळेत शिकणाऱ्या चार वर्षीय अल्पवयीन मुलीवर शाळेतील शिपायाकडून करून लैंगिक अत्याचार करण्यात आला होता. मुलीच्या पोटात वेदना होऊ लागल्यानंतर पालकांनी विश्वासात घेऊन विचारपूस केली, असता अत्याचाराचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला.


शेकडो पालक रस्त्यावर, ठिय्या आंदोलन सुरू


पालकांच्या तक्रारीनंतर समता नगर पोलिसांनी गुन्हा दाखल करून आरोपीस अटक देखील केली आहे. मात्र, या प्रकरणात शाळेकडून हलगर्जी झाल्याचा आरोप करत पालकांनी आज शाळेविरोधात तीव्र आंदोलन छेडले आहे. शेकडो पालक रस्त्यावर ठिय्या आंदोलन देत शाळा प्रशासनाविरोधात जोरदार घोषणाबाजी करत असल्याचे या ठिकाणी पाहायला मिळत आहे. शाळेच्या मुख्याध्यापका विरोधात देखील कारवाई करण्याची मागणी करत पालकांनी मागील तासाभरापासून रस्ता अडवून आंदोलन सुरू केलं आहे. यावेळी आंदोलक पालकांनी पोलिसांना देखील घेराव घातला असून या ठिकाणी जोरदार घोषणाबाजी करण्यात येत आहे.


महत्त्वाच्या इतर बातम्या :


Amravati Crime : माणुसकीला काळीमा! महाप्रसादाला नेतो सांगत तरुणीवर 5 नराधमांकडून सामूहिक अत्याचार, आधी अपहरण मग शेतान नेऊन...