Mumbai Private Bus Driver News मुंबई: मुंबईत काही दिवसांआधी कुर्ल्यात बेस्ट बसचा अपघात (Mumbai Private Bus Driver News) झाला होता. या अपघातामध्ये 9 जणांचा दुर्देवी मृत्यू झाला तर अनेकजण जखमी झाले होते. या अपघाताला काही दिवस उलटले असताना आता पुन्हा एक भयावह प्रकार समोर आला आहे. 


अंधेरीमधील खाजगी बस चालक आणि क्लीनर दारूचे नशेत शाळेच्या मुलांना घेऊन पिकनिकला निघाल्याचं समोर आलं आहे. मुंबईच्या अंधेरी पूर्वेमधील खाजगी बस चालकाने हा कारनामा केला आहे. दारूच्या नशेत बस अंधेरी कुर्ला रोडवर नागमोडी चालवत असताना वाहतूक पोलिसांनी बस थांबवली. साहार वाहतूक पोलिसांनी बस थांबवल्यानंतर बस चालक आणि क्लीनर दोघे दारूचे नशेत असल्याचं समोर आले. पोलिसांनी वेळेवर बस थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे.


नेमकं काय घडलं?


मुंबईच्या अंधेरी पूर्वेतील खाजगी बस चालकाचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. साकीनाका योगीराज श्रीकृष्ण विद्यालयमधून शाळेच्या मुलांना घेऊन ही खासगी बस गोराईमध्ये पिकनिकसाठी आज सकाळी 9:30 वाजता निघाली होती. या बसमध्ये योगीराज शाळेचे 40 ते 50 मुलं होते. दारूच्या नशेत बस अंधेरी कुर्ला रोडवर नागमोडी चालवत असताना वाहतूक पोलिसांनी बस थांबवली. यानंतर पोलिसांनी बस चालकाची तपासणी केली. यानंतर साहार वाहतूक पोलिसांनी बस थांबवल्यानंतर बस चालक आणि क्लीनर दोघे दारूचे नशेत असल्याचे आढळून आले. पोलिसांनी वेळेवर बस थांबवल्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. या सर्व प्रकारानंतर वाहतूक पोलिसांनी बस ताब्यात घेतल्यानंतर शाळेचे मुख्यध्यापक आणि पालकांना बोलावलं. आता बस चालक आणि बस क्लीनरवर पोलिसांकडून कारवाई सुरू आहे. 


महिलेला पाहून केले अश्लील कृत्य, दक्षिण मुंबईतील धक्कादायक प्रकार-


कंबाला हिल येथे महिलेला पाहून अश्लील चाळे करणाऱ्या 27 वर्षीय आरोपीला गावदेवी पोलिसांनी रविवारी अटक केली. आरोपी आग्रा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. त्याच्याविरोधात विनयभंगाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. पीडित महिला 30 नोव्हेंबरला टॅक्सीतून जात असताना कंबाला हिल बस थांब्याजवळ उभा असलेला एक तरुण पीडित महिलेला पाहून अश्लील चाळे करत होता. पीडित महिलेने याबाबत गावदेवी पोलिसांकडे तक्रार केली. त्यानुसार पोलिसांनी गुन्हा दाखल केला.पोलिसांना आरोपी आग्रा येथील रहिवासी असल्याचे समजले. त्यानूसार पोलिसांनी तेथे जाऊन आरोपीला अटक केली. 


संबंधित बातमी:


Dhule Crime News : बनावट सह्या करत अकाउंटंटने 51 लाखांनी गंडवले; आमदार अनूप अग्रवाल यांच्या वडिलांची तक्रार