मुंबई: बीएमसी अधिकारी असल्याचं सांगत पहिला 10 हजाराची लाच मागितली, आणि नंतर चोरी करुन पळून जाण्याचा प्रयत्न करणाऱ्या एका आरोपीला पोलिसांनी अटक केली. अक्षय बाबूराव धोत्रे (वय 24) असं अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव असून ओशिवारी पोलिस स्टेशनमध्ये त्याच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. 


आरोपी अक्षय बाबू धोत्रे हा खारदांडा या परिसरातील राहणारा असून त्याने बीएमसी अधिकारी असल्याचं सांगत फिर्यादी मंजू राकेश जैन (वय 63 वर्ष) याच्याकडून 10 हजारांची लाच मागितली. 11 नोव्हेंबर रोजी ही घटना घडली. फिर्यादी घरी असताना अक्षय धोत्रे हा त्याच्या घरी गेला आणि बीएमसीच्या ईस्ट वार्ड अंधेरी पश्चिम मेंटेनन्स विभागातून आल्याचं त्याला सांगितलं. त्याच्या फ्लॅटमध्ये बेकायदेशीर पद्धतीने रीनोवेशनचे काम चालू असल्याची माहिती मिळाल्याने तो आला असल्याचं त्याने फिर्यादीला सांगितले. 


बेकायदेशीर रिनोवेशनच्या कामावर कारवाई न करण्यासाठी आरोपीने फिर्यादीकडून दहा हजार रुपयाची मागणी केली. पण त्या वेळी फिर्यादीने हे पैसे देण्यास नकार दिला. त्यानंतर आरोपी अक्षय याने फिर्यादीना धक्का देऊन जबरदस्तीने फिर्यादीच्या गळ्यातील सोन्याची चेन ओढून घेण्याचा प्रयत्न केला. पण त्या ठिकाणी असलेले कामगार फिर्यादीच्या मदतीला आल्याने आरोपी त्या ठिकाणाहून पळून गेला. 


फिर्यादी मंजू राकेश जैन (रा. फ्लॅट नंबर 701, ए विंग, आयर्लंड पार्क सोसायटी, लोखंडवाला, अंधेरी पश्चिम) यांनी दिलेल्या तक्रारीवरुन ओशिवरा पोलीसांनी आयपीसी कलम 393, 170, 420 प्रमाणे आरोपीवर गुन्हा दाखल केला आहे. अक्षय धोत्रे सराईत गुन्हेगार असून त्याच्यावर दादर आणि दिंडोशी पोलिस ठाण्यात चोरीसारखे इतर गुन्हे दाखल आहेत. 


तोतया अधिकारी बनून व्यावसायिकाच्या घरी रेड


मुंबईत जुलै महिन्यात एका व्यावसायिकाच्या घरी आयकर विभागाच्या अधिकाऱ्यांनी छापेमारी केल्याची घटना घडली होती. पण ते सर्व अधिकारी अक्षय कुमारच्या स्पेशल 26 चित्रपटाप्रमाणे तोतया अधिकारी असल्याचं समोर आलं. आयकर विभागाचे अधिकारी असल्याचं सांगून पाच जणांच्या टोळीने मुंबईतल्या विक्रोळीमध्ये राहणाऱ्या एका व्यावसायिकाच्या घरावर छापा टाकला आणि या बनावट कारवाईत रोख जप्त केली. पण पोलिसांनी देखील वेगाने तपासाची चक्र फिरवत तोतया आयकर अधिकाऱ्यांच्या टोळीच्या मुसक्या आवळल्या. आरोपींमध्ये मनोविकार तज्ज्ञ प्रशांत भटनागर, वाहतूक व्यावसायिक वसीम कुरेशी, चालक धीरज कांब