मुंबई : आजकाल सायबर क्राईमचे प्रमाण चांगलेच वाढले आहे. फोन कॉलद्वारे अनेकांची आर्थिक लूट झाल्याच्या घटना समोर आल्या आहेत. आरोपी अनोळखी नंबरवरून कॉल करून आम्ही पोलीस आहोत, सरकारी अधिकारी आहोत, असे भासवतात आणि भोळ्याभाबड्या नागरिकांची आर्थिक लूट करतात. अशा खोट्या फोन कॉल्सना बळी पडू नये, असे आवाहन पोलिसांकडून केले जाते. दरम्यान, असाच काहीसा प्रकार मुंबईत समोर आला आहे. येथे एका आरोपीने मुंबई भाजपाचे (BJP) अध्यक्ष तथा आमदार आशिष शेलार (MLA Ashish Shelar) यांचा पीए असल्याचे भासवून वकील आणि त्याच्या क्लायंट्सच्या नातेवाईकांची फसवणूक झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी आशिष शेलार यांचे पीए नवनाथ सातपुते यांनी वांद्रे पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.


नेमका प्रकार काय आहे?


मिळालेल्या माहितीनुसार नवनाथ सातपुते यांच्या तक्रारीनंतर वांद्रे पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांनी या कारवाईत आरोपीवर अटकेची कारवाई केली आहे. आमिन इरफान बेंद्रेकर (26 वर्षे) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे.


आरोपी नेमकी फसवणूक कशी करायचा?


अटक करण्यात आलेला आरोपी वकिलाला फोन करून त्यांच्या क्लायंटचा तुरुंगात असलेला नातेवाईक घसरून पडला आहे. त्याला रुग्णालयात उपचारासाठी नेलेले आहे. उपचारासाठी आठ हजार रुपये लागत असल्याचे सांगत त्याने पैसे उकळले होते.आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरोधात मुंबईच्या विविध पोलीस ठाण्यात फसवणुकीचे 14 गुन्हे दाखल आहेत. सध्या वांद्रे पोलिसांनी या आरोपीला अटक करून अधिक तपासाला सुरुवात केली आहे. 


हेही वाचा :


अलिबागमध्ये आंतरराष्ट्रीय फ्रॉड कॉल सेंटरचा पर्दाफाश, अमेरिकेच्या नागरिकांची केली जात होती फसवणूक


शेअर मार्केटमध्ये जास्त परतावा मिळवून देतो सांगत कोट्यवधींची फसवणूक, ‘असा’ घातला माजी सैनिकांना गंडा


Yavatmal News : नोकरीचे आमिष दाखवून अभियंत्याची फसवणूक; पोलिसांनी चौघांच्या आवळल्या मुसक्या, लाखोंचा मुद्देमालही जप्त