Mumbai Crime : भारत गॅस वितरण एजन्सी मिळवून देण्याच्या नावाखाली 29 वर्षीय तरुणाची फसवणूक झाल्याचा प्रकार मुंबईच्या (Mumbai) पवई (Powai) परिसरात घडला आहे. गॅस एजन्सी (Gas Agency) घेऊ इच्छिणाऱ्या तरुणाला लाखो रुपयांचा गंडा घालण्यात आला होता. या प्रकरणी तरुणाची तब्बल 6 लाख 88 हजार 816 रुपयांची फसवणूक झाली होती. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यानंतर पवई पोलिसांच्या सायबर पोलिसांनी (Cyber Police) एचडीएफसी बँकेचा (HDFC Bank) सेल्स मॅनेजरला अटक केली आहे.
गुगलवर माहिती घेऊन गॅस एजन्सी सुरु करण्याचा निर्णय
मिळालेल्या माहितीनुसार हर्षित कुमार सिंह याला नवीन व्यवसाय सुरु करायचा होता. यासाठी त्याने गुगलवर माहिती घेऊन भारत गॅस वितरण एजन्सी सुरु करण्याचा निर्णय घेतला. त्याने गॅस एजन्सीच्या वेबसाईटवर 10 नोव्हेंबर 2022 या दिवशी रजिस्ट्रेशन करुन कागदपत्रांची पूर्तता देखील केली. डिपॉझिट म्हणून तब्बल सहा लाख 88 हजार 816 रुपयांचं ऑनलाईन ट्रान्झॅक्शन केलं. मात्र अनेक महिने उलटून गेल्यानंतरही गॅस वितरण एजन्सी भेटली नाही, म्हणून कंपनीकडे पुन्हा मोबाईलवर संपर्क साधून चौकशी करण्याचा प्रयत्न केला असता अनेक मोबाईल बंद येऊ लागले. यामुळे हर्षित यांनी आपली फसवणूक झाल्याबाबतची तक्रार पवई पोलीस ठाण्यामध्ये दिली.
एचडीएफसी बँकेच्या सेल्स मॅनेजरला अटक
हर्षित सिंह यांनी दिलेल्या तक्रारीवरुन माहिती तंत्रज्ञान कलमानुसार फसवणुकीचा गुन्हा दाखल केला. यावरुन सायबर पोलिसांनी या गुन्ह्याची उकल करण्यासाठी एक टीम तयार केली. तक्रारदाराने पाठवलेली रक्कम ज्या बँकांमध्ये गेल्या त्या बँकांचे ठेवायचे हे एकाच व्यक्तीकडून झाल्याचे निष्पन्न झाले. त्यानंतर पोलिसांचा संशय बळवल्याने या खात्याविषयीची चौकशी केली. यात ती खाती एचडीएफसी बँकेत सेल्स मॅनेजर म्हणून काम करणाऱ्या पंचवीस वर्षे तरुणाने बांधकाम साईटवर काम करणाऱ्या तरुणाचे डॉक्युमेंट वापरुन तयार केली होती आणि ती ऑनलाईन फ्रॉड करणाऱ्या लोकांकडे सोपवली होती. यामुळे पवई पोलिसांच्या सायबर टीमने एचडीएफसी बँकेच्या सेल्स मॅनेजरला केली आहे.
आरोपीला अटक केल्यानंतर आरोपी सेल्स मॅनेजरने सुरु केलेली दोन खाती तामिळनाडू सायबर पोलिसांनी फ्रीज केली असून त्याबाबत अधिक माहिती पोलीस घेत आहेत. गुन्ह्यात वापरलेल्या वेबसाईट आणि ई-मेलचा वापर करुन अशाप्रकारे अनेक गुन्हे केले असण्याची शक्यता आहे. याबाबत अधिक तपास करत आहोत.
हेही वाचा
Mumbai Crime : भारत गॅस एजन्सी देण्याच्या बहाण्याने शिक्षकाला 15 लाखांचा चुना, आरोपीला बेड्या