Mumbai Crime : मुंबई (Mumbai) पश्चिम उपनगरातील चारकोप पोलीस ठाण्याच्या हद्दीत बिल्डिंगच्या फ्लॅटमध्ये पॉर्न चित्रपट (Porn Film) बनवणाऱ्या टोळीचा कारनामा उघडकीस आला आहे. परदेशी वेब सीरिज (Web Series) बनवण्याच्या नावाखाली स्ट्रगलर स्त्री कलाकाराला काम देण्याच्या नावाखाली पॉर्न चित्रपटात काम करण्यास सांगितले. यामुळे या स्त्री कलाकाराच्या तक्रारीनंतर निर्माता आणि दिग्दर्शक यास्मीन खानसह चार आरोपींविरोधात चारकोप पोलीस (Charkop Police) ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.  


यास्मीन, अनिरुद्ध प्रसाद जंगडे, अमित पासवान आणि आदित्य अशी चारही आरोपींची नावं आहेत. त्यांच्याविरोधात आयपीसी आणि आयटी अॅक्टच्या विविध कलमांतर्गत गुन्ह्याची नोंद झाली आहे. चारकोप पोलिसांनी या प्रकरणी एक आरोपीला अटक केली असून इतर तीन जणांचा शोध सुरु आहे. महत्त्वाचं म्हणजे यास्मीन खानला दीड वर्षापूर्वी मुंबई पोलिसांनी अशाच प्रकरणात अटक केली होती. 


पॉर्न फिल्म बनवून इंटरनेटवर अपलोड
चारकोप परिसरामध्ये एक महिला स्ट्रगलर चित्रपटात काम शोधत होती. या दरम्यान तिला राहुल ठाकूर नावाच्या एका व्यक्तीने सिनेमात काम करण्यासाठी संपर्क करुन केशव नावाच्या व्यक्तीसोबत संपर्क करण्यास सांगितलं होतं. केशवने तिच्याकडे बायोडेटा आणि फोटो मागितले आणि राहुल पांड्ये नावाच्या व्यक्तीशी संपर्क करण्यास सांगितलं. तिने राहुल पांड्येशी संपर्क केल्यानंतर त्याने सांगितलं की वेब सीरिजमध्ये काम करावं लागेल आणि त्यात बोल्ड सीन देखील असतात. भारतात ही वेब सीरिज रिलीज होणार असल्याने तिने यास नकार दिला. ऑक्टोबर महिन्यात राहुल ठाकूरने या महिलेशी पुन्हा संपर्क केला. मोबाईल अॅपसाठी वेब सीरिज बनवत असूत ती परदेशात प्रदर्शित होणार आहे आणि त्यातही बोल्ड सीन आहेत. त्यावर या स्त्रीने काम करण्यास होकार दिला. यानंतर तिला अनिरुद्धला भेटायला सांगितलं. त्याने या स्त्रीला चारकोपमधील एका फ्लॅटमध्ये नेलं. तिथे एक महिला मेकअप आर्टिस्ट, यास्मीन, अनिरुद्ध आणि आदित्य होते. यास्मीनने स्वत:ला कॅमेरापर्सन असल्याचं सांगितलं. तर अनिरुद्ध आणि आदित्यला अभिनेते असल्याचं सांगितलं. 


शूटिंगदरम्यान यास्मीनने महिलेला कपडे काढण्यास सांगितलं. परंतु तिने नकार दिल्याने यास्मीनने तिला 15 लाख रुपयांचा मानहानीचा खटला दाखल करण्याची धमकी दिली. घाबरलेल्या स्त्रीने यास्मीनच्या भीतीने चित्रीकरण केलं. यानंतर 22 ऑक्टोबरला स्त्रीच्या परिचीत व्यक्तीने तिला तिचा व्हिडीओ अश्लील साईटवर अशल्याचं सांगितलं. यानतंर महिलेने यास्मीनला व्हिडीओ हटवण्यास सांगितलं.  यावर यास्मीन खानने 25 हजार रुपयांची मागणी केली. मात्र नंतर तिने पीडितेचा फोन उचलणं बंद केलं. मग महिलेने या चार जणांविरोधात भांडुप पोलीस स्टेशनमध्ये दाखल झाली होती. ही घटना चारकोपला घडली असल्यामुळे हे प्रकरण चारकोप पोलिसांकडे वर्ग करण्यात आलं. तिच्या या तक्रारीवरुन पोलिसांनी यातील एक आरोपीला अटक केली असून उर्वरित तिघांचा पोलीस आता शोध घेत आहेत.


पोलीस काय म्हणाले?
29 नोव्हेंबरला भांडूप पोलीस स्टेशनमधील तक्रार चारकोप पोलीस स्टेशनकडे वर्ग झाली होती. बोल्ड शूटिंगच्या नावाखाली चारकोपमधील एका फ्लॅटमध्ये तिचे आक्षेपार्ह दृश्य त्यांनी रेकॉर्ड केले होते. महिलेच्या तक्रारीनंतर चारकोप पोलिसांनी तातडीने गुन्हा दाखल केला आहे. तिचा जबाब नोंदवून आरोपींचा शोध सुरु केला. दोन दिवसांपूर्वी एका आरोपीला अटक करण्यात आली. एकूण चार आरोपी आहेत, त्यापैकी तीन आरोपी फरार आहेत. या प्रकरणात मुख्य आरोपी ही महिला आहे, अशी माहिती  परिमंडळ 11 चे पोलीस उपायुक्त अजय कुमार बन्सल यांनी दिली.


VIDEO : Kandivali मध्ये वेब सीरिजच्या नावाखाली अश्लील फिल्मचं शूट, कांदिवलीच्या चारकोपमधील धक्कादायक प्रकार