India Corona Update : भारतातील कोरोनाचे (Corona) संकट आता जवळपास संपत आले आहे. आज सलग 8 व्या दिवशी 300 पेक्षा कमी कोरोना रुग्णांची (Corona Patients) नोंद झाली आहे. तर काल कोरोनाचे 226 नवीन रुग्ण आढळले. यानंतर, देशात आतापर्यंत अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या वाढून 4 कोटी 46 लाख 73 हजार 618 झाली आहे, तर आजची अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या पाहता 4,434 झाली आहे.
दररोज 300 हून कमी कोरोनाचे नवे रुग्ण
सोमवारी सकाळी केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत संसर्गामुळे आणखी दोन रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मृतांची संख्या 5,30,630 झाली आहे. तर 27 नोव्हेंबर रोजी देशात 291 कोरोना रुग्ण आढळले. तेव्हापासून सातत्याने दररोज 300 हून कमी कोरोनाचे नवीन रुग्ण येत आहेत.
अॅक्टिव्ह रुग्णसंख्येत मोठी घसरण
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या आकडेवारीनुसार, देशात कोरोना विषाणू संसर्गावर उपचार घेत असलेल्या रुग्णांची संख्या 4,434 वर आली आहे, जी एकूण रुग्णसंख्येच्या 0.01 टक्के आहे. गेल्या 24 तासात उपचार करत असलेल्या रुग्णांच्या संख्येत 95 ने घट झाली आहे. रुग्णांच्या बरे होण्याचा राष्ट्रीय दर 98.80 टक्के आहे. देशात आतापर्यंत एकूण 4,41,38,554 लोक संसर्गमुक्त झाले आहेत, तर कोविड-19 मुळे मृत्यूचे प्रमाण 1.19 टक्के आहे.
देशात आतापर्यंत किती लसीकरण?
आरोग्य मंत्रालयाच्या वेबसाइटनुसार, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत कोविड-19 विरोधी लसींचे 219.94 कोटी डोस देण्यात आले आहेत.
प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन
जगासह देशात कोरोनाचा संसर्ग कायम असून त्यासोबतच भारतात इतर संसर्गजन्य रोगांचा धोका वाढताना दिसत होता. देशात व्हायरल फ्लू, सर्दी, खोकला यांसह गोवरचा धोका दिवसागणिक वाढत आहे. त्यामुळे प्रशासनाकडून काळजी घेण्याचं आवाहन करण्यात येत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या