Mumbai Crime News : मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दुबईहून आलेल्या परदेशी महिलेकडून लाखोंचे अंमली पदार्थ (Drugs) जप्त करण्यात आले आहेत. महसूल गुप्तचर संचालनालयाच्या (Directorate of Revenue Intelligence) अधिकाऱ्यांना आलेल्या संशय आल्यामुळं महिलेला थांबवून तिची चौकशी करण्यात आली. चौकशी दरम्यान, महिलेजवळ तब्बल 10 लाखांचे ड्रग्ज आढळून आले. या महिलेनं हे ड्रग्ज तिच्या पोटात लपवून आणले होते. अधिकाऱ्यांना चौकशी दरम्यान, महिलेच्या पोटातून तब्बल 214 ग्रॅम हेरॉईनचे ड्रग्ज जप्त करण्यात आलं. जप्त केलेल्या अमली पदार्थांची आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत किंमत तब्बल 10 लाख रुपये आहे. 


महिलेच्या पोटातून 20 कॅप्सूल जप्त 


एक महिला ड्रग्ज घेऊन आल्याची माहिती महसूल गुप्तचर संचालनालयाला मिळाली होती. त्यानंतर दुबईहून आलेल्या महिलेला थांबवून प्रथम तिच्या बॅगची झडती घेण्यात आली, मात्र डीआरआयला त्यातून काहीही मिळालं नाही. तिच्या शरीराची तपासणी केली असता तिच्या पोटातून 20 कॅप्सूल सापडल्या. डीआरआयनं त्या कॅप्सूलची तपासणी केली असता, त्यामध्ये हेरॉईनचे ड्रग्ज असल्याचं आढळून आलं.


पोलिसांकडून अधिक तपास सुरु 


मिळालेल्या माहितीनुसार, ड्रग्ज तस्करी करणाऱ्या महिलेला अटक करण्यात आली असून, तिच्या पोटातून निघालेल्या कॅप्सूलही जप्त करण्यात आल्या आहेत. तसेच, याप्रकरणी सध्या पोलीस अधिक तपास करत आहेत. या ड्रग्ज कुठून आणल्या? कोणाला देणार होती? याबाबत पोलीस तपास करत आहेत. यासोबतच तिच्या पोटात ड्रग्जनं भरलेल्या कॅप्सूल टाकण्यास कोणी मदत केली? याचाही तपास पोलिसांकडून सुरु आहे. महिलेच्या फोनचीही तपासणी पोलिसांकडून केली जात आहे.  


महत्त्वाच्या इतर बातम्या :