Mumbai Crime News : मुंबई : मुंबईतील भेंडी बाजारातील एका व्यावसायिकानं कर्जबाजारीपणाला (Indebtedness) कंटाळून आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. शुक्रवारी रात्री साडेआठच्या सुमारास भेंडी बाजारातील एका व्यावसायिकानं आपल्या कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या केली. जेजे मार्ग पोलीस स्टेशनकडून मिळालेल्या माहितीनुसार, 52 वर्षीय व्यापारी इक्बाल मोहम्मद सिवानी यांनी शुक्रवारी रात्री सव्वादोन ते आठ वाजण्याच्या सुमारास भेंडीबाजार भागातील अमीन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या कार्यालयात गोळी झाडून आत्महत्या केली.                                


इक्बालनं आत्महत्या केली, तेव्हा कार्यालयातील इतर कर्मचारीही तिथे उपस्थित होते, असं सांगण्यात येत आहे. मयत इक्बाल मोहम्मद हे कर्जाच्या विळख्यात होते, व्यवसायात सतत तोटा होत असल्यानं त्यांनी आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे.


नेमकं काय घडलं?                             


भेंडी बाजारात काल रात्री साडेआठच्या सुमारास एका व्यावसायिकानं आपल्या कार्यालयात स्वतःला गोळी झाडून आत्महत्या केली धक्कादायक माहीती समोर येत आहे. 52 वर्षीय व्यापारी इक्बाल मोहम्मद सिवानी यांनी शुक्रवारी रात्री पावणे आठ वाजण्याच्या सुमारास भेंडी बाजार परिसरातील अमीन बिल्डिंगच्या पहिल्या मजल्यावर असलेल्या त्यांच्या कार्यालयात स्वत:वर गोळी झाडून आत्महत्या केली. इक्बाल यांनी आत्महत्या केली, तेव्हा कार्यालयातील इतर कर्मचारीही तिथे उपस्थित होते, अशी माहिती मिळत आहे. मयत इक्बाल मोहम्मद हे कर्जाच्या विळख्यात होते, व्यवसायात सतत तोटा होत असल्यानं ते तणावाखाली होते. त्यातूनच त्यांनी आत्महत्येसारखं टोकाचं पाऊल उचलल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं असून पोलिसांचा पुढील तपास सुरू आहे. 


पोलिसांकडून कसून तपास सुरू 


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, कर्जाला कंटाळून व्यावसियाकानं आत्महत्या केल्याचं प्राथमिक तपासात समोर आलं आहे. या प्रकरणाचा अधिक तपास पोलिसांकडून सुरू आहे. तसेच, पोलिसांकडून इतर कारणांचीही तपासणी सुरू आहे. या घटनेनंतर पोलिसांनी ज्या कार्यालयात व्यावसायिकाचा मृतदेह आढळला, त्या कार्यालयातून मृतदेह ताब्यात घेऊन पोस्टमॉर्टमसाठी पाठवला आहे. तसेच, ज्या बंदुकीतून गोळी झाडून आत्महत्या केली, ती बंदूकही ताब्यात घेतली आहे. याप्रकरणी पोलिसांनी एडीआर अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे. मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 


महिला कॉन्स्टेबलचा पती झाला सैतान; आई-पत्नी मुलाला यमसदनी धाडलं, नंतर स्वतः लाही संपवलं