Relationship Tips : कोणत्याही नात्याचा पाया हा विश्वासावर उभा असतो. नात्यात (Relation) प्रेम तसेच एकमेकांची काळजी घेणे हा एक प्रेमाचा भाग आहे. पण तुम्हाला माहीत आहे का? काही लोक प्रेमाच्या नावाखाली अति काळजी करायला लागतात. हे देखील नाते कमकुवत होण्याचे किंवा ते तुटण्याचे कारण बनते. नात्यावर त्याचा कसा वाईट परिणाम होतो? जाणून घ्या...
नातं टिकवून ठेवण अत्यंत कठीण..!
आजच्या काळात नातं टिकवणं थोडं कठीण झालं आहे. सोशल मीडियाच्या या युगात आता जोडप्यांना एकमेकांकडून जास्त अपेक्षा आहेत. पण तुम्हाला माहीत आहे का की कधी-कधी हे प्रेम नात्यासाठी अडचणीचे ठरते. येथे आपण प्रेमाच्या नावाखाली अतिकाळजीबद्दल बोलत आहोत. काही लोक आपल्या जोडीदाराची इतकी काळजी करतात की त्यांना अंतर राखणे भाग पडते. त्याचा वाईट परिणाम नाते तुटण्याच्या उंबरठ्यावर घेऊन जातो. बरं, काही लोक ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डरचे बळी आहेत आणि अति काळजी घेणे हा त्याचा एक भाग आहे. ऑब्सेसिव्ह लव्ह डिसऑर्डरने ग्रस्त व्यक्ती आपल्या जोडीदाराला एकटे सोडत नाही आणि इतरांनी त्याच्याशी बोलणे देखील त्याला आवडत नाही. या विकाराचा फटका नात्याला अनेक प्रकारे सहन करावा लागतो. तुम्ही किंवा तुमचा जोडीदार ओव्हर केअरिंगच्या प्रभावाखाली आहात का? जोडीदाराच्या काळजीमुळे नातेसंबंध कसे धोक्यात येतात ते आम्ही तुम्हाला सांगतो.
मर्यादा विसरून जाऊ नका
जास्त काळजी जोडप्यांमधील मर्यादा नष्ट करू लागते. हे खरे आहे की कमी बोलणे देखील नातेसंबंधासाठी चांगले नाही, परंतु जास्त गुंतणे देखील वैयक्तिक जागेचे नुकसान करते. चिंताग्रस्त व्यक्ती आपल्या मर्यादा विसरते आणि आपल्या जोडीदाराला अस्वस्थ करते. हे लक्षण आहे की, अति काळजीचा तुमच्या नात्यावर वाईट परिणाम होत आहे.
प्रत्येक निर्णय स्वतः घ्या
जास्त काळजी घेत असल्यामुळे नात्यातील भागीदार देखील एकमेकांचे निर्णय स्वतः घेऊ लागतात. वैयक्तिक समस्या असो किंवा कार्यालयीन समस्या… ज्या व्यक्तीला जास्त काळजी वाटते ती स्वतःचे निर्णय जोडीदारावर लादते. निर्णय घेण्याऐवजी जोडीदाराला सल्ला देणे चांगले. अशा प्रकारे, तुमच्या दोघांमध्ये एक मजबूत बंध तयार होईल आणि नात्यात आनंद कायम राहील.
स्वत:ला गमावाल
जेव्हा तुम्ही एखाद्या व्यक्तीच्या चिंतेकडे जास्त लक्ष देण्यास सुरुवात करता, तेव्हा स्वतःला हरवून बसण्याची परिस्थिती निर्माण होते. आपल्या जोडीदाराला सर्वस्व मानून आपण स्वतःच्या आयुष्याकडे दुर्लक्ष करू लागतो. हा एक प्रकारचा स्वार्थत्याग आहे आणि त्यामुळे नात्यात अडचणी निर्माण होतात. व्यक्तिमत्व कमी होणे, संभाषणाची शैली बदलणे यासारख्या चिन्हे सूचित करतात की आपण स्वतःला हरवू लागलो आहोत. नातेसंबंधात सर्वकाही व्यवस्थित ठेवण्यासाठी, स्वतःची काळजी घेणे आवश्यक आहे.
जोडीदाराकडून अपेक्षा ठेवा.. पण...
जे लोक जास्त काळजी घेतात त्यांना जोडीदाराकडून खूप अपेक्षा ठेवण्याची सवय असते. त्यामुळे नात्यात अडचणी निर्माण होऊ लागतात. एका वेळी एकाच घरात एकत्र राहूनही माणसे जुळत नाहीत. अपेक्षांमुळे नात्यात गैरसमज होतात. त्यामुळे एकमेकांच्या सीमा जपल्या पाहिजेत.
हेही वाचा>>>
Relationship Tips : काय सांगता! नात्यात प्रेम वाढवण्यासाठी जोडीदाराशी 'हे' खोटं बिनधास्त बोला? नातं आणखी घट्ट होईल
(टीप : वरील सर्व गोष्टी माहिती म्हणून वाचकांपर्यंत पोहोचवत आहोत. एबीपी माझा यातून कोणताही दावा करत नाही. )