मुंबई : कस्टम्सच्या एअर इंटेलिजन्स युनिटने (Customs Department ) शुक्रवारी मुंबई विमानतळावर  (Mumbai Airport) 32 कोटी रुपयांचे 61 कोलो सोने जप्त केले आहे. याप्रकरणी सात आरोपींना अटक करण्यात आली असून त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.


अटक करण्यात आलेले आरोपी हे कतार एअरवेजच्या विमानाने मुंबईत आले होते. सर्व आरोपी प्रवाशी होते. त्यांना भारतात सोने आणण्यासाठी पैशाचे आमिष दाखवण्यात आले होते. परंतु, त्यांना भारतातील सीमाशुल्क कायद्याबाबत माहिती नव्हती. त्यामुळे हे सर्व जण एवढं सोनं घेऊन आले. पोलिसांनी अकट केल्यानंतर सर्व आरोपींना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.  






"अटक करण्यात आलेल्या आरोपींनी सोने तस्करीच्या  रॅकेटशी संबंधित काही लोकांची नावे पोलिसांना दिली आहेत. तपास यंत्रणा त्या लोकांची माहिती काढत आहे, अशी माहिती कस्टमच्या वतीने न्यायालयात दिली आहे.   






आतापर्यंतची सर्वात मोठी कारवाई 
मुंबई  विमनतळावर वेगवेगळ्या दोन घटनेत 61 किलो सोना जप्त करण्यात आलं. एकाच दिवशी कारवाई करत कस्टम विभागाने 32  कोटी किंमतीचा सोनं जप्त केलं आहे. एका दिवसात आतापर्यंतची ही सर्वात मोठी कारवाई असल्याची माहिती आहे. यात पहिली कारवाई युएईवरून आलेल्या तस्करी  प्रकरणात 4 आरोपी तर दुसऱ्या प्रकरणात दुबईवरून आलेले तीन प्रवासी म्हणजे एकूण 7 प्रवाशांना अटक करण्यात आली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपींमध्ये पाच पुरुष आणि  दोन महिला प्रवाशांचा समावेश असल्याची माहिती मुंबई एअरपोर्ट कस्टम विभागाने दिली आहे.  


महत्वाच्या बातम्या


20 पथकांचे 75 तासांच सर्च ऑपरेशन, पोलिसांनी 12 वर्षाच्या रुद्रची केली सुटका, पाच जणांना ठोकल्या बेड्या