मुंबई : मुंबईत एका 32 वर्षीय तरुणानं ऑनलाइन शॉपिंगच्या नावाखाली तब्बल 22,000 लोकांना फसवल्याचे समोर आलं आहे. याद्वारे त्याने 70 लाख रुपयांना गंडा घातला आहे. यूनिव्हर्सिटी ऑफ लंडनहून शिक्षण घेऊन तो भारतात परतला होता. वडिलांच्या कपड्यांच्या व्यवसायात झालेलं नुकसान भरुन काढण्यासाठी त्याने हा चुकीचा मार्ग निवडला.


सायबर सेलच्या डीसीपी रश्मी करंदीकर यांनी सांगितलं की बनावट शॉपिंग साईटच्या माध्यमातून देशभरातील 22 हजार महिलांची फसवणूक केल्याप्रकरणी गुजरातमधून एका तरुणाला अटक करण्यात आली आहे. आशिष अहिर (वय 32), असे अटक करण्यात आलेल्या मुख्य आरोपीचे नाव आहे.


मुलाला वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश देतो सांगत भामट्यांकडून शिक्षकाची 10 लाखांना फसवणूक


पोलिसांनी अशा आणखी 11 बनावट संकेतस्थळांची ओळख पटवली आहे. shopiiee.com या संकेतस्थळाबाबत पोलिसांना अनेक तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. ज्याचा वापर करुन अहीर लोकांना फसवत होता.


ऑनलाईन मोबाईल खरेदीत फसवणूक झाल्याच्या नैराश्यातून बारावीच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; चंद्रपुरातील घटना


ईशा कश्मीरी यांचं म्हणणं आहे की, लॉकडाऊनच्या वेळी त्यांना ऑनलाइन शॉपिंग शिवाय दुसरा पर्याय नव्हता. ऑनलाइन सर्च करत असताना फेसबुकवर त्यांना आरोपीची वेबसाइट दिसली आणि त्याच्यावर त्यानी कपडे ऑर्डर केले. पण बऱ्याच दिवस होऊन त्यांना कपडे न मिळाल्याने त्यांनी त्या वेबसाइटवर लोकांच्या प्रतिक्रिया पाहिल्या. त्यानंतर त्यांच्या लक्षात आलं की ही वेबसाइट लोकांची फसवणूक करण्यासाठी बनवली आहे. त्यांनी याची पोलिसांना तक्रार केली.