Chote Ustad 3: मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद 3 या स्टार प्रवाह वाहिनीवरील छोट्या उत्पादनांचा घरोघरी कौतुक होताना दिसत आहे . या स्पर्धेचा महाअंतिम सोहळा नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला . देवांश भाटे , स्वरा ,पलाक्षी दीक्षित जुही चव्हाण सारंगभालके आणि गीत बागडे यांच्यात झालेल्या सुरेल स्पर्धेत यवतमाळच्या गीत बागडेनं छोटे उस्तादच्या ट्रॉफीवर मोहोर उठवली . 


काय मिळालं बक्षीस?


गेल्या काही दिवसांपासून छाेट्या उस्तादांनी आपल्या सुरेल अंदाजाची मोठी चर्चा होती. या स्पर्धकांना प्रेक्षकांचंही भरभरून प्रेम मिळालं आहे. दरम्यान,सहा छोट्या उस्तादांमध्ये ही महाअंतिम लढत रंगली. अटीतटीच्या या लढतीत यवतमाळच्या गीत बागडेने बाजी मारत विजेतेपदावर मोहोर उमटवली. तर उपविजेता संगमनेरचा सारंग भालके ठरला. विरारच्या पलाक्षी दीक्षितने तृतीय क्रमांक पटकावला तर उत्तेजनार्थ पारितोषिक जुई चव्हाण, देवांश भाटे आणि स्वरा किंबहुने यांना विभागून देण्यात आलं. मी होणार सुपरस्टार छोटे उस्ताद ३ ची विजेती गीत बागडेला पाच लाखांची रक्कम आणि सन्मानचिन्ह देण्यात आलं. 


मला खूप काही शिकायला मिळालं..


विजेतेपदाचा आनंद व्यक्त करताना गीत बागडे म्हणाली, ‘हा प्रवास माझ्यासाठी स्वप्नवत आहे. माझ्या बाबांच्या खंबीर पाठिंब्यामुळे मी स्पर्धेत भाग घेऊ शकले. या मंचाने फक्त गाणंच नाही तर मला आत्मविश्वासही दिला. आम्हाला मार्गदर्शन करणारे सुप्रसिद्ध संगीतकार अविनाश-विश्वजीत सर यांचे विशेष आभार. इतक्या दिवसांच्या मेहनतीचं फळ मिळाल्यामुळे खूप आनंद होत आहे. या मंचाने सचिन पिळगांवकर, वैशाली सामंत आणि आदर्श शिंदे गुरुच्या रुपात दिले. या गुरुंकडून खूप काही शिकायला मिळालं. स्टार प्रवाहने मी होणार सुपरस्टार छोटे उस्तादच्या रुपात नव्या पाढीसाठी हा मंच खुला करुन दिला आहे त्यांची देखिल मी ऋणी आहे.’