ठाणे : बदलापूर (Badlapur School Abuse Case) येथील शाळेत बालिकांवरील लैंगिक अत्याचाराच्या प्रकाराने राज्यभरात संतापाची लाट उसळलेली असतानाच मुंबईत बुधवारी अल्पवयीन मुलींवरील अत्याचाराचे आणखी एक प्रकरण समोर आले आहे. कांदिवली परिसरात घरात शिरलेल्या तरुणाने 14 वर्षांच्या अपंग मुलीचा विनयभंग केल्याची घटना भरदिवसा घडली आहे. या प्रकरणी एका आरोपीला कुरार पोलिसांनी अटक झाली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, घटनेच्या दिवशी मुलगी घरी एकटीच होती. तिचे आई-वडील कामावर गेले होते, त्यानंतर तिच्या एकटेपणाचा फायदा घेत आरोपीने जबरदस्तीने तिच्या घरात घुसून मुलीचा विनयभंग केला. यानंतर पीडित मुलगी घाबरली, काही दिवस मुलगी शांत असल्याचे तिच्या आईच्या लक्षात आले, आईने तिला विश्वासात घेऊन विचारपूस केली असता. तिने घडलेला प्रकार सांगितला पीडित तरुणीने पोलिसांना दिलेल्या तक्रारीनंतर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी तात्काळ विनयभंग आणि पॉक्सो कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून आरोपीला अटक केली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव विकास गोरे आहे.
खारमध्ये दोन अल्पवयीन मुलींचा शेजार्याकडून विनयभंग
मुंबईच्या खार दांडा परिसरात दोन सख्ख्या अल्पवयीन मुलींचां विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे. याप्रकरणी मुलींच्या आई वडिलांनी खार पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर आरोपी विरोधात पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून याप्रकरणी खार पोलिसांनी आरोपीला तात्काळ अटक केली आहे.अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव अमन सिंग असून तो फिर्यादी यांच्या शेजारी राहणारा आहे. खार पोलीस याप्रकरणी अधिक तपास करत आहेत.
मुंबईत बाल लैंगिक अत्याचारात वाढ
बदलापूर येथील जनउद्रेकाच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील वाढत्या बाल लैंगिक अत्याचाराचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. विशेष कायदा, विशेष न्यायालये, खटल्यांची जलदगतीने सुरू असलेली सुनावणी प्रक्रियेला वेग आल्यानंतरही बालकांवरील लैंगिक अत्याचार सुरूच असून उलट त्यात मोठ्या प्रमाणात वाढ झाल्याचे आकडेवारीतून समोर आले आह. मे 2024 पर्यंत 1016 घटनांची नोंद झाली आहे.
हे ही वाचा :
सदरक्षणाय खलनिग्रहणाय'चा अर्थ कळतो का? बदलापूर प्रकरणात हायकोर्टाने पोलिसांना झाडलं, सुनावणीतील 10 मोठे मुद्दे