MHADA : म्हाडाचा विभागीय घटक असलेल्या कोंकण मंडळातर्फे ऑक्टोबर 2021 मध्ये 8 हजार 984 सदनिकांच्या विक्रीसाठी संगणकीय सोडत काढण्यात आली. या सोडतीतील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेतील संकेत क्रमांक 282 ते 319 मधील पात्रता/अपात्रता निश्चितीसाठी आवश्यक कागदपत्रे याआधी दिलेल्या मुदतीत सादर न करु शकलेल्या यशस्वी अर्जदारांना कागदपत्रे बँकेत सादर करण्यासाठी 15 फेब्रुवारी, 2022 पर्यंत अंतिम मुदतवाढ देण्यात आली आहे.


कोंकण मंडळातर्फे सोडत जाहीर झाल्यानंतर यशस्वी अर्जदारांना पात्रता/अपात्रता निश्चित करण्यासाठी आवश्यक असलेली कागदपत्रे सादर करण्यासाठी तात्काळ प्रथम सूचना पत्रे (First Intimation Letter) पाठविण्यात आली आहेत. सोडतीतील 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत 812 यशस्वी अर्जदारांपैकी 621 यशस्वी अर्जदारांनी बँकेत कागदपत्रे सादर केली आहेत. मात्र, 191 यशस्वी अर्जदारांनी अद्यापही बँकेत आवश्यक कागदपत्रे सादर केलेली नाहीत, अशा यशस्वी अर्जदारांना बँक ऑफ महाराष्ट्रच्या संपूर्ण राज्यभरात मंडळाने निर्धारित केलेल्या शाखांमध्ये आवश्यक कागदपत्रे 15 फेब्रुवारीपर्यंत सादर करण्याची सूचना दिली आहे.       


कुठे किती सदनिका?


कोंकण मंडळाने 2021 साली काढलेल्या सोडतीत 20 टक्के सर्वसमावेशक योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी चंदनसर (ता. वसई, जि. पालघर) येथे 8, वडवली (मोघरपाडा, ठाणे) येथे 76 सदनिका, मौजे कावेसर आनंद नगर (ता. जि. ठाणे) येथे 23 सदनिका, गाव वालिव (ता. वसई, जि. पालघर) 16 सदनिका, कोपरी (ता वसई, जि. पालघर) येथे 2 सदनिकांचा समावेश आहे. अल्प उत्पन्न गटासाठी कासारवडवली (ता. जि. ठाणे) येथे 16 सदनिका, मौजे वडवली (ता. जि. ठाणे) येथे 116 सदनिका, मोघरपाडा (ठाणे पश्चिम) येथे 1 सदनिका, मौजे पारसिक नगर (ता. जि. ठाणे) येथे 35 सदनिका, मौजे डावले (ता. जि. ठाणे) येथे 28 सदनिका, मौजे कावेसर (ता. जि. ठाणे) येथे 140 सदनिका, बाळकुम- ठाणे येथे 21 सदनिका, भाईंदरपाडा-ठाणे येथे 24 सदनिका, अगासन-ठाणे येथे 47 सदनिका, टिटवाळा (ता. कल्याण, जि. ठाणे)  येथे 62 सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर 11 येथे 40 सदनिका, घणसोली- नवी मुंबई सेक्टर 8 येथे 51 सदनिका, मौजे वाळीव (ता. वसई, जि. पालघर) येथे 68 सदनिका, कोपरी (ता. वसई, जि. पालघर) येथील 20 सदनिकांचा समावेश आहे.


हे ही वाचा - 



मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live