Nashik Malegaon News मालेगाव : मुलीला पळवून नेत तिच्याशी विवाह करणाऱ्या २९ वर्षीय तरुणाचा गोळी झाडून खून (Malegaon Crime) झाल्याची घटना मालेगाव (Malegaon) शहरात ५ फेब्रुवारी रोजी उघड झाली होती. या प्रकरणी पोलिसांनी (Police) तरुणीच्या पित्यासह भाऊ तसेच बंदूक पुरवणाऱ्यासह दोन साथीदारांना अटक केली आहे. 


याबाबत अधिक माहिती अशी की, मयत इब्राहिम गांजावाला याने युसूफ खिचडा याच्या मुलीला पळवून नेऊन लग्न केले होते.याचा राग मनात धरून तसेच आपल्या साथीदाराचा गांजा पकडवून दिल्यामुळे मुलीच्या पित्याने इब्राहिमची गोळ्या झाडून हत्या केली होती.  या प्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला होता. 


पित्यासह भावाला घेतले पोलिसांनी ताब्यात


इब्राहिमची हत्या केल्यानंतर त्याचा मृतदेह शहरातील ओवादी नाल्यात फेकून देण्यात आला. पोलिसांना त्याचा मृतदेह नाल्यात आढळून आला होता. या प्रकरणी रमजानपुरा व स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी तपसाची चक्रे फिरवली. पोलिसांनी गुप्त माहितीच्या आणि तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे  तरुणीच्या पित्यासह भाऊ तसेच बंदूक पुरवणाऱ्यासह दोन साथीदार यांना अटक केली आहे. त्यांच्याकडून दुचाकी व मोबाईल फोन ताब्यात घेण्यात आले आहे. 


सराईत गुन्हेगाराची नाशिकमध्ये हत्या


सराईत गुन्हेगार संदेश काजळे (Sandesh Kajale) हा पंचवटीतील निमाणी बसस्थानकासमोरील सूर्या हॉस्पिटलच्या मागील पार्किंगमध्ये  आला होता. त्याचे संशयित मित्र नितीन उर्फ पप्पू चौगुले, रणजित आहेर व स्वप्निल दिनेश उन्हवणे, पवन भालेराव आणि इतरांमध्ये आर्थिक देवाण घेवाणीतून वाद झाले. यानंतर काजळेस मारहाण करुन त्याला कारमध्ये ढकलून अपहरण करण्यात आले. प्रितेश काजळे याने पाच जणांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात अपहरणाची तक्रार दाखल केली होती. याप्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला होता. रविवारी पहाटे मोखाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत ताकपाडा परिसरातील निर्जन जंगलात काजळे याचा अर्धवट जळालेला मृतदेह मोखाडा पोलिसांना आढळून आला. याप्रकरणी पोलिसांनी संशयित आरोपी स्वप्नील उन्हवणे यास अटक केली आहे.


किरकोळ कारणावरून नाशिकमध्ये आणखी एक खून


किरकोळ कारणावरून एका रिक्षाचालकाने दुसऱ्या रिक्षा चालकाचा डोक्यात पहार व दंडुका घालून खून केला. शंकर गाडगीळ (Shankar Gadgil) व आरोपी हल्लेखोर सोनू नवगिरे, सोनू कांबळे, महेंद्र कांबळे यांचा काही तरी किरकोळ कारणावरून वाद झाला होता.  तिघांपैकी एकाने रॉड डोक्यात टाकल्याने शंकर रक्ताच्या थारोळ्यात कोसळला. त्याला शासकीय जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले. अवघ्या अर्ध्या तासात तिघा संशयित आरोपींना पोलिसांनी ताब्यात घेतले. 


आणखी वाचा 


Nagpur Crime : प्रेयसीवरील संशयातून व्हॅलेंटाईन डेलाच उपराजधानीत हत्येचा थरार; मित्राचीच केली भरदिवसा हत्या