Mumbai-Ahmedabad National Highway: मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर लुटारु टोळीच्या एकाला अटक करण्यात मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाच्या क्राईम युनिट 3 ला यश आलंय. सिनेमातल्या एखाद्या सीन सारखं गाडीचा पाठलाग करत, गाडीवर फायरींग करत पोलिसांनी एका दरोडेखोराला अटक करण्यात यश मिळवलं. त्यानंतर पोलिसांनी मुंबईतून आणखी तीन जणांना अटक केली. या टोळीने काही दिवसांपूर्वी 72 लाखांचा दरोडा टाकला होता.


मिळालेली माहितीनुसार, 18 फेब्रुवारीला फेब्रुवारीला मुंबई अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर गुजरात येथील एका व्यापाऱ्याचा ट्रक महामार्गावरील लुटारुच्या टोळीने अंदाजे एक कोटीची सुपारीचा मुद्देमाल दरोडेखोरांनी लुटून नेला होता. याचा तपास करण्यासाठी मिरा भाईंदर वसई विरार आयुक्तालयाची क्राइम युनीटची दोन पथक कार्यरत होती. क्राइम युनीट 3 च्या टिमला सुपारी लुटून नेलेल्या ट्रक खाली परत मुंबईच्या दिशेने येत असल्याची माहिती मिळाली. पोलिसांच्या दोन पथकाने महामार्गावर सापळा रचला होता. मंगळवारी रात्री सव्वा दोनच्या सुमारास एक ट्रक खानिवडे टोल नाका क्रॉस करुन येत असताना संशयास्पद आढळून आला.


पोलिसांनी त्याला थांबवण्यास सांगितल्यावर त्याने चक्क पोलिसांवर गाडी चढवली. सुदैवाने यात कुणीही जखमी झालं नाही. मात्र, क्राइम युनीट ३ चे पोलीस निरीक्षक प्रमोद बडाख यांनी गाडी थांबवण्यासाठी गाडीच्या टायरवर चार राउंड फायर केले. दुर्दैवाने यातील एक राउंड टायरच्या लोखंडी विल ला  लागून, रिबॅक आणि बडाख यांच्या पोटावर लागला. बडाख यांना किरकोळ जखम लागली आहे. सध्या यात जयवीर रामस्वरुप याला अटक करण्यात आली. त्याच्यावर भारतीय दंड कलम 307 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


रात्रीच्या अंधारात  दरोडेखोर मुंबई अहमदाबाद महामार्गावर सुमारे 17 मिनिटे पोलिसांना चकमा देत होता. महामार्गावरील लुटेऱ्यांची ही मोठी टोळी आहे. पोलिसांनी केलेल्या थरारक कारवाईत आतापर्यंत चौघांना अटक करण्यात आली. 


हे देखील वाचा- 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha