Dhule News : धुळे शहरातील अवधान परिसरात एकाच कामगार कुटुंबातील पाच सदस्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्याची खळबळजनक घटना घडली आहे. या घटनेत ते पाचही जण बचावले आहेत. तरी कुटुंबातील कर्त्या व्यक्तीची प्रकृती गंभीर आहे. कुटुंबातील अल्पवयीन मुलासह आई-वडिलांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केल्यानं त्यांच्यावर हिरे मेडिकलच्या जिल्हा सर्वोच्च रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 


धुळे शहरातील अवधान परिसरात असलेल्या दौलत नगरमध्ये ही घटना घडली आहे. अवधान शिवारातील एमआयडीसीमध्ये कामास असलेला गणेश गोपाळ आणि त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी विषप्राशन केलं. पत्नी सविताच्या विवाहबाह्य संबंधांमुळे कौटुंबिक कलह झाला आणि त्यातून सविताचा पती गणेश गोपाळणं विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यापाठोपाठ पत्नी सविता, मुलगी जयश्री, मुलगा गणेश यांच्यासह सविताचा प्रियकन भरत पारधीनंही विष प्राशन करुन आत्महत्येचा प्रयत्न केला. शेजाऱ्यांना ही बाब लक्षात आल्यानंतर त्यांनी सर्वांना तातडीनं जिल्हा रुग्णालयात दाखल केलं. त्यामुळे पाचही जणांचे जीव वाचले आहेत. मात्र गणेश गोपाळ याची प्रकृती गंभीर आहे. गणेशवर अतिदक्षता कक्षात उपचार सुरू आहेत. 


दरम्यान, प्राथमिक तपासात भरत पारधी आणि सविता गोपाळ यांच्या प्रेम संबंधातून कौटुंबिक कलह झाल्याची माहिती समोर आली आहे. भरत आणि सविताच्या या प्रेमसंबंधांना भरतच्या कुटुंबियांचा विरोध होता, त्यातून होणाऱ्या कलहातून या पाचही जणांनी विष प्राशन केल्याची माहिती मिळत आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या : 



LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह | ABP Majha