Yavatmal News Update : यवतमाळमधील पांढरकवडा तालुक्यातील मराठवाकडी गावा जवळ 28 लाख 52 हजारांचे कपाशीचे बोगस बीटी बियाणे जप्त करण्यात आले आहे. पांढरकवडा पोलीस पेट्रोलिंग करत असताना संशयितरीत्या उभा असलेल्या वाहनाची तपासणी केल्यानंतर हे बोगस बीटी बियाणे आढळून आले. ही कारवाई आज सकाळी बारा वाजण्याच्या सुमारास करण्यात आली.


पांढरकवडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी आणि त्यांचे पथक रस्त्यावर पेट्रोलिंग करत होते. यावेळी एका जीपमध्ये (क्रमांक KA, 40 A 9994) रिकामी कॅरेट असल्याचे पोलिसांच्या लक्षात आले. कॅरेट तर रिकामी होती, परंतु, वाहनांच्या चाकावर प्रेशर असल्याचे लक्षात आल्यामुळे पोलिसांचा संशय बळावला. त्यामुळे पोलिसांनी तपासणी केली असता रिकाम्या कॅरेट खाली बोगस बियाण्याच्या बोरी आढळून आल्या.


पोलिसांनी जप्त केलेले बोगस बीटी बियाणे कर्नाटक येथून तेलंगणा मार्गे महाराष्ट्रमध्ये येत होते. याची विक्री शेतकऱ्यांना घरपपोच 930 रुपयांना करण्यात येणार होती. यामध्ये काव्या नावाचे बोगस बीटी 1400 पाकिटे तर पावणी नावाचे 1600 पाकिटे आणि वाहन असा 33 लाख 52 हजार रूपयांचा मुद्धेमाल जप्त करण्यात आला. या प्रकरणी चालक मंजुनाथ रेड्डी ( रा. कर्नाटक) आणि साथीदार व्यंकटेशस्वरा आदिनारायन डुग्गुबाती ( रा आंध्रप्रदेश) या दोघांना अटक पांढरकवडा पोलिसांनी अटक केली आहे.


कृषी विभागाचे कृषी विकास अधिकारी राजेंद्र माळोदे, कृषी अधिकारी पंकज बरडे, कृषी अधिकारी सुरेश चव्हाण यांनी बियाण्यांची मोजमाप करून पांढरकवडा पोलिसांत गुन्हा दाखल केला. पांढरकवडा पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक हेमराज कोळी आणि त्यांच्या पथकाने ही कारवाई केली.


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



महत्वाच्या बातम्या