पुणे : पती-पत्नीच्या नात्याला काळीमा फासणारी घटना बुधवारी समोर आली आहे. पुण्यातील भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात एक धक्कादायक घटना उघडकीस आली. एका व्यक्तीने स्वतःच्या पत्नीला आपल्या दोन मित्रांसोबत शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. शारीरिक संबंध ठेवत असताना पती स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता. याप्रकरणी भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात पती आणि त्याच्या दोन साथीदारांनी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
48 वर्षीय विवाहित महिलेने या प्रकरणी तक्रार दिली आहे. आरोपी पतीने फिर्यादी महिलेला वेळोवेळी मानसिक त्रास दिला. तसेच तिची इच्छा नसतानाही डिसेंबर 2020 मध्ये हडपसर येथील एका लॉजवर एका मित्रांबरोबर शारीरिक संबंध ठेवण्यास भाग पाडले. त्यानंतर जुलै 2021 मध्ये कोरेगाव पार्क परिसरातील एका फ्लॅटवर आणखी एका मित्रांसोबत पत्नीला अनैसर्गिक शरीर संबंध ठेवण्यास भाग पाडले. आणि हे सर्व होत असताना आरोपी स्वतः त्या ठिकाणी उभा राहून हे सर्व पाहत होता. या सर्व प्रकरणानंतर फिर्यादी महिलेने आज अखेर भारती विद्यापीठ पोलिस ठाण्यात तक्रार दिली. त्यानुसार पतीसह त्याचा दोन मित्रांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
भारतीय समाजात पितृसत्ताक पद्धतीचा प्रभाव असल्याने पत्नी आपल्या पतीची गुलाम असल्यासारखी वागणूक दिले जाते. तिच्या प्रत्येक गोष्टीवर नवऱ्याचा अधिकार असतो. पती त्याला वाटेल तेव्हा पत्नीचा उपभोग घेऊ शकतो, असेही मानले जाते. मात्र आता या गैरसमजुती बदलण्याची आवश्यकता आहे. महिलांवर होणाऱ्या अत्याचारांविरोधात कडक पावलं उचलायला हवीत, अशी मागणी समाजातून होत आहे.
संबंधित बातम्या :