Microsoft Salary Hike: जगातील सर्वात मोठ्या टेक कंपनीपैकी एक असलेल्या मायक्रोसॉफ्टच्या कर्मचाऱ्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. लवकरच मायक्रोसॉफ्ट कर्मचाऱ्यांचे पगार दुप्पट होणार आहेत. या वृत्ताला कंपनीचे सीईओ सत्या नाडेला यांनी स्वतः दुजोरा दिला आहे. त्यांनी कर्मचार्‍यांना एक ईमेल पाठवत सांगितले की, मायक्रोसॉफ्टमधील उच्च प्रतिभा आणि गुणवत्ता असलेल्या सर्व कंचाऱ्यांचे पगार जवळपास दुप्पट करणार आहेत.


मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला म्हणाले आहेत की, ते त्यांच्या कंपनीच्या कर्मचार्‍यांच्या कामाचे नेहमीच कौतुक करतात. त्यांनी आपल्या ईमेलमध्ये लिहिले आहे की, कंपनीच्या टॅलेंटला खूप मागणी आहे आणि यामुळे आम्हाला वेळोवेळी परिस्थितीचा आढावा घ्यावा लागतो. तुम्ही आमच्यासाठी मौल्यवान आहात आणि ग्राहक आणि भागीदारांना सक्षम बनवण्याचे उत्तम काम करत आहोत. 


कोणत्या कर्मचाऱ्यांना मिळणार याचा लाभ


सत्या नाडेला म्हणाले की, आम्ही आमचे जागतिक गुणवत्ता बजेट दुप्पट करत आहोत. त्याचे फायदे वेगवेगळ्या मार्केट डेटाच्या आधारे देशानुसार बदलतील आणि जास्तीत जास्त पगार वाढ बाजाराची मागणी कुठे आहे, यावर अवलंबून असेल. 67 किंवा त्यापेक्षा कमी स्तरावरील सर्व कर्मचाऱ्यांचे दरवर्षी किमान 25 टक्क्यांनी स्टॉक रेंज वाढवणार आहे. मायक्रोसॉफ्टचे सीईओ सत्या नाडेला यांच्या ईमेल मिळाल्यानंतर कर्मचाऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे. 


अलीकडेच अॅमेझॉनने कर्मचाऱ्यांच्या पगारात केली वाढ 


मायक्रोसॉफ्ट व्यतिरिक्त अनेक मोठ्या कंपन्यांनी आपल्या कर्मचाऱ्यांच्या पगारात आधीच वाढ केली असून यामध्ये अॅमेझॉनचे नाव उच्च स्थानी आहे. फेब्रुवारीमध्येच Amazon ने कॉर्पोरेट आणि आयटी कर्मचार्‍यांसाठी मूळ वेतन दुप्पट केले आहे. कंपनीने आपल्या कर्मचाऱ्यांचे वेतन 160,000 डॉलर्सवरून 350,000 डॉलर्स केले आहे. 


महत्त्वाच्या इतर बातम्या