औरंगबाद : सासू  सुनेच्या वादावर आधारित अनेक मालिका आपण पहिल्या असतील. मालिकेत सासू- सुनेच्या कुरघोड्या आपण अनुभवल्या असतील .पण औरंगाबादेत सासू सुनेच्या नात्याला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पैठण तालुक्यातील पाटेगावात छोट्या वादावरून चक्क सुनेने  घरात स्वयंपाक करत असलेल्या सासूच्या डोक्यात दांडूका घालून खून केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. पोलिसांनी सुनेला ताब्यात घेतलं असून पुढील चौकशी पोलीस करत आहेत.


पैठण पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार,  पैठण शहरापासून 2 किमी अंतरावर पाटेगाव नावाचे गाव आहे . गावात शेतात गवत काढण्यावरून काल कौसाबाई अंबादास हरवणे आणि कांचन गणेश हरवणे  यांच्यात   वाद झाला होता . हा वाद गेल्या काही दिवसांपासून सुरू होता. कौसाबाई आणि त्यांची सून कांचन यांच्यात सतत छोट्या-मोठ्या गोष्ठीवरून वाद व्हायचे. दरम्यान काल ( मंगळवारी ) कांचन आणि  कौसाबाई शेतात काम करत असताना गवत कापण्यावरून त्यांच्यात कडाक्याचे भांडण झाले. त्यामुळे कांचन यांच्या डोक्यात सासूबाबत प्रचंड राग होता. आज सकाळी 9 वाजेच्या दरम्यान कांचन यांचे पती अंबादास हरवणे दूध टाकण्यासाठी बाहेर गेले. यावेळी कांचन यांनी स्वयंपाक करत असलेल्या सासूचा डोक्यात लाकडी दांड्याने मारहाण करायला सुरुवात केली.  सून सासूला एवढी मारत होती की, स्वयंपाक घरात रक्ताचा सडा पडला होता. हे पाहून पोलिसही चक्रावले .


घटनेची माहिती मिळताच उपविभागीय पोलीस अधिकारी विशाल नेहुल यांच्यासह पैठण पोलिसांनी धाव घेतली. आरोपी सुनेला ताब्यात घेण्यात आले आहे. त्यावेळी आरोपी महिलेच्या चेहऱ्यावर थोडं ही दुःख दिसत नव्हते .  या घटनेनंतर परिसरात खळबळ उडाली आहे. सासू-सुनेमध्ये होणारे वाद काही नवीन नाही,पण हाच वाद एखाद्याचा जीव घेण्यापर्यंत जाऊ शकतो हे पाहून सर्वांचा धक्का बसला आहे.


संबंधित बातम्या :


Gondia Crime : एकतर्फी प्रेमातून 17 वर्षीय तरुणाचा मुलीच्या दोन नातेवाईकांवर चाकू हल्ला