Aurangabad News: सद्या बाजारात वेगवेगळ्या कंपनीच्या टीव्ही विक्रीसाठी उपलब्ध आहे. मात्र औरंगाबाद पोलिसांनी केलेल्या एका कारवाईनंतर बाजारात कंपनीच्या नावाने बनावट टीव्हींची विक्री करण्यात येत असल्याचे समोर आले आहे. एका प्रसिद्ध कंपनीच्या नावचे स्टीकर वापरुन, त्याच कंपनीचे टीव्ही असल्याचे भासवून विक्री करणाऱ्या दुकानमालकास औरंगाबाद शहर पोलिसांच्या जिन्सी पोलिसांनी अटक केली. तर या दुकानदारावर पोलिसांनी गुन्हा देखील दाखल केला आहे. सय्यद मसूद सय्यद अशपाक (वय 34 वर्षे, रा. शरीफ कॉलनी, जाली की दर्गाजवळ रोशनगेट) असे या आरोपी दुकानदाराचे नाव आहे.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एमआय शाओमी कंपनीच्या नावचे स्टीकर वापरुन त्याच कंपनीच्या टीव्ही असल्याचे भासवून विक्री करणाऱ्या दुकानमालकास जिन्सी पोलिसांनी अटक केली. ही कारवाई दोन फेब्रुवारी रोजी शरीफ अली कॉलनी, रोशनगेट परिसरात करण्यात आली. सय्यद मसूद सय्यद अशपाक असे त्या आरोपी दुकानदाराचे नाव आहे. तर याप्रकरणी नेत्रिका कन्सल्टिंग कंपनीत वरिष्ठ अधिकारी असलेले दिपक पटेल (वय 45 वर्षे, रा. मुंबई) यांच्या फिर्यादीनुसार, आरोपी सय्यद मसूदवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दिपक पटेल हे शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लिमीटेड (एमआय टीव्ही) या कंपनीच्या टीव्हीचा साटा व विक्री करणाऱ्या विरोधात कॉपीराईट, ट्रेडमार्क संदर्भात तपासणी करतात, त्यांच्या तपासणीनंतर हा सर्व प्रकार समोर आला आहे. 


कंपनीच्या नावाने बनावट टीव्हींची विक्री


याबाबत पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शाओमी टेक्नॉलॉजी इंडिया प्रा. लिमीटेड (एमआय टीव्ही) या कंपनीच्या टीव्हीचा साठा आणि विक्री करणाऱ्या विरोधात कॉपीराईट, ट्रेडमार्क संदर्भात तपासणी करण्याची जबाबदारी दीपक पटेल यांच्याकडे होती. दरम्यान, रोशन गेट परिसरात असाच एक प्रकार सुरू असल्याची त्यांना माहिती मिळाली होती. त्यावरुन त्यांनी जिन्सी ठाण्याच्या पथकाला माहिती दिली. त्यामुळे जिन्सी पोलीस आणि पटेल यांचे सहकारी विनोद सुमरा, इयान गोम्स यांनी मिळून रोशनगेट परिसरातील रजा इलेट्रॉनिक्समध्येमध्ये दोन फेब्रुवारी रोजी दुपारी साडेतीन वाजता छापा मारला. यावेळी दुकानात शाओमीचे स्टीकर लावलेल्या प्रत्येकी 16 हजार 499 किमतीच्या तब्बल 3 लाख 29 हजार 980 रुपयांच्या (20 नग) आढळून आले. त्यामुळे या बनावट टीव्ही जप्त करण्यात आल्या असून दुकानमालक सय्यद मसूद यालाही अटक करण्यात आले आहे. त्याच्याविरोधात जिन्सी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून पुढील तपास उपनिरीक्षक अशपाक शेख करत आहेत.


एकसमान नंबर असलेले लेबल 


जिन्सी पोलिसांनी सदर दुकानात छापा मारला असता त्यांना, 32 इंची MI कंपनीचे लोगो लावलेल्या एकूण 20 टीव्ही कागदी पुठ्यात ठेवलेले आढळून आले. प्रत्येक टीव्हीच्या पाठीमागे बारकोडच्या खाली 8901876240458 असा एकसमान नंबर असलेले लेबल लावलेले होते. या सर्व टीव्हींची MI कंपनीचे प्रतिनिधीनी यांनी खात्री केली असता, सर्व टीव्ही बनावट असल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी कारवाई केली आहे. 


महत्वाच्या इतर बातम्या : 


अबब! 2 लाख 40 हजार वाहनधारकांना दंड भरण्यासाठी एकाच दिवशी बोलावले; औरंगाबाद पोलिसांच्या आदेशाची सर्वत्र चर्चा