Vidarbha Weather News : विदर्भातील शीतलहर तीव्र झाली आहे. नागपूरसह सर्व जिल्ह्यात थंडीचा कडाका वाढला आहे. नागपूरच्या तापमानात पुन्हा तीन अंशांची घसरण झाली आहे. पारा दुसऱ्यांदा नीचांकावर आला आहे. जवळपास आठवडाभर थंडीची लाट कायम राहणार असल्याचे प्रादेशिक हवामान विभागाचे म्हणणे आहे.
राजस्थान आणि उत्तर भारताकडून थंड वारे
राजस्थान आणि उत्तर भारताकडून वाहत असलेल्या थंड वाऱ्यांमुळं विदर्भात अचानक थंडी वाढली आहे. गुरुवारच्या तुलनेत नागपूरच्या (Nagpur) तापमानात आणखी 3.1 अंशांची घसरण होऊन पारा 9.6 अंशांवर आला आहे. विदर्भासह नागपुरात नीचांकी तापमानाची नोंद झाली. औरंगाबाद येथेही इतकेच (9.6 अंश सेल्सिअस) तापमान नोंदले गेले.
दोन दिवसात नागपूरमध्ये तापमानाचा पारा तब्बल साडेसहा अंशांची घसरण झाली. 8 जानेवारीला नागपूरच्या किमान तापमानाने या वर्षातील 8.0 अंशांचा नीचांक नोंदवला होता, तो मोडण्याची शक्यता नाकारता येत नाही. विदर्भात यवतमाळ (10.0 अंश सेल्सिअस), अमरावती (10.5 अंश सेल्सिअस), अकोला (10.6 अंश सेल्सिअस), गोंदिया (10.8 अंश सेल्सिअस), वर्धा (11.2 अंश सेल्सिअस) आणि चंद्रपुर (11.4 अंश सेल्सिअस) येथेही थंडीचा कडाका जाणवला.
परभणीचे तापमान 8.2 अंशावर, सर्वत्र गारठा वाढला
परभणीचे तापमान आज तापमान अचानकपणे घटून थेट 8.2 अंश सेल्सिअसवर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र गारठा वाढला असून कडाक्याची थंडी जाणवत आहे. परभणीचे तापमान आज तापमान अचानकपणे घटून थेट 8.2 अंश सेल्सिअसवर आलं आहे. यामुळे पुन्हा एकदा सर्वत्र गारठा वाढला असून कडाक्याची थंडी जाणवत आहे. मागच्या महिनाभरापासून जिल्ह्याचे तापमान 12 ते 14 अंश सेल्सिअस दरम्यान कायम आहे. त्यामुळे अगोदरच जिल्ह्यात थंडीचा कडाका आहे. त्यातच आज अचानक तापमानात 4.2 अंश सेल्सिअसने घरसण झाली. परिणामी तापमान थेट 8.2 अंश सेल्सिअसवर आलं. त्यामुळे थंडीत कमालीची वाढ झाली असून परभणीकरांना पुन्हा एकदा हुडहुडी भरली आहे.
दिल्ली- मध्य प्रदेशसह या राज्यांमध्ये थंडीपासून दिलासा
उत्तर भारतातील अनेक राज्यांमध्ये, सकाळ आणि संध्याकाळी थंडी वाढली आहे, छत्तीसगडमध्ये तापमानात सतत घट नोंदवली जात आहे. उत्तरेकडून येणाऱ्या थंड व कोरड्या वाऱ्यामुळे तापमानाचा पारा सातत्याने घसरत असून थंडी वाढत आहे. हवामान विभागाच्या माहितीनुसार, सुरगुजा विभागातील जिल्ह्यांमध्ये हलके धुके आहे. जशपूरमध्ये सर्वात कमी तापमान 4 अंश नोंदवण्यात आले. रायपूरमध्ये किमान तापमान 13.4 अंशांवर पोहोचले आहे.
ही बातमी देखील वाचा...