Aurangabad Crime News: वाढत्या टेक्नॉलॉजीचा फायदा होत असल्याचे अनेकदा वेगवेगळ्या घटनांमधून समोर आले आहे. अशीच काही घटना औरंगाबादच्या (Aurangabad) कन्नड तालुक्यात पाहायला मिळत आहे. कारण कन्नड शहरात स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम (State Bank Of India ATM) मशीन शनिवारी मध्यरात्री फोडण्याचा प्रयत्न झाला. मात्र सायरन (Siren) वाजल्याने बँकेच्या मुंबई येथील सतर्क असणाऱ्या यंत्रणेला माहिती तत्काळ माहिती मिळाली आणि त्यांनी कन्नड शहर पोलिसांना (Police) फोन करून माहिती दिल्याने पोलिसांनी थेट घटनास्थळ गाठून एकाला ताब्यात घेतले. शेख सलीम शेख शब्बीर पठाण ( वय 40 रा. गराडा, ता. कन्नड) आरोपीचे नाव आहे.


याबाबत पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, 28 जानेवारीला शनिवारी मध्यरात्री शहरातील बाजार समिती लगत असलेले स्टेट बँक ऑफ इंडियाचे एटीएम मशीन फोडण्यासाठी चोरटे आले. दरम्यान चोरट्याकडून रात्री सव्वा एक वाजता एटीएम फोडण्यासाठी सुरुवात झाली. मात्र बँकेची यंत्रणा सक्षम असल्याने मुंबई येथील कार्यालयात एटीएम फोडण्यात येत असल्याचा सायरन वाजला. त्यामुळे बँकेच्या  मुंबई येथील कार्यालयातील यंत्रणेकडून तत्काळ याची माहिती कन्नड शहर पोलिस ठाण्यात देण्यात आली. 


एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्न करताना पकडले 


मुंबई येथील कार्यालयातील यंत्रणेकडून माहिती मिळताच, पोलिस निरीक्षक राजू तळेकर यांनी मोटारसायकलवर गस्त घालणाऱ्या पथकातील पोलिस नाईक सुशील सुराडे, विलास घातगिने तसेच पोलिस नाईक प्रवीण बर्डे, सहायक फौजदार कैलास मडावी, हेड कॉन्स्टेबल गणेश जैन, पोलिस अंमलदार विशाल कुलकणी यांना घटनास्थळी पाठवले. पोलिस तेथे पोहचल्यावर देखील चोरट्याचे सुरुवातीला त्यांच्याकडे लक्ष नव्हते. तो एटीएम मशीन फोडण्याच्या प्रयत्नात व्यस्त होता. त्यामुळे पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. 


यापूर्वी देखील एटीएम फोडण्याचा केला होता प्रयत्न


शेख सलीम शेख शब्बीर पठाण यास ताब्यात घेऊन पोलिसांनी चौकशी सुरू केली. त्याच्याकडे त्यावेळी एटीएम कार्ड नसल्याचे चौकशीत स्पष्ट झाले. पोलिसांनी त्याला खाक्या दाखवताच त्याने एटीएम फोडत असल्याचे मान्य केले. सोबतच याच आरोपीने यापूर्वी पिशोर नाका येथील एचडीएफसीचे एटीएम मशीन फोडण्याचा प्रयत्न केल्याचे देखील मान्य केले आहे. तर तेथील सीसीटीव्ही फुटेजमधील चोरट्याचे व याचे वर्णन मिळते जुळते आहे. 


इतर महत्वाच्या बातम्या: 


Aurangabad Crime News: औरंगाबाद पोलिसांनी पकडला 14 लाखांचा गुटखा; बंदी असूनही विक्री सुरूच