Nagpur Crime : देशभर गाजलेल्या नागपूरातील भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या नेत्या सना खान (Sana Khan) यांच्या हत्या प्रकरणाला नवं वळण लागलं आहे. या हत्या प्रकरणात अत्यंत धक्कादायक खुलासे झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार याच्या पोलीस तपासात अमित साहूच्या घरातून सना खान यांच्याशिवाय इतर दोन लोकांच्या रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीत सापडले आहे. पोलिसांनी त्या रक्ताची डीएनए चाचणी केली असून ते रक्त सना खान आणि अमित साहू यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे..



फॉरेन्सिक तपासणीत इतर दोन लोकांच्या रक्ताचे डाग सापडले


देशभरात नागपूरातील भाजप अल्पसंख्यांक आघाडीच्या नेत्या सना खान यांच्या हत्या प्रकरणात काही अत्यंत धक्कादायक खुलासे झाले आहे. 2 ऑगस्ट 2023 रोजी सना खान यांची हत्या झाली, त्या दिवशी अमित साहूच्या जबलपूर येथील घरी मारेकरी अमित शाहू आणि सना खान यांच्या व्यतिरिक्तही एक पुरुष आणि एक महिला उपस्थित होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे. कारण पोलीस तपासात अमित साहूच्या घरातून सना खान यांच्याशिवाय इतर दोन लोकांच्या रक्ताचे डाग फॉरेन्सिक तपासणीत सापडले आहे. पोलिसांनी त्या रक्ताची डीएनए चाचणी केली असून ते रक्त सना खान आणि अमित साहू यांच्या व्यतिरिक्त आणखी दोन व्यक्तीचे असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे हत्येची घटना घडली, तेव्हा त्या घरी तेव्हा आणखी कोणी उपस्थित होते का? असा प्रश्न निर्माण झाला आहे.


 


मोलकरीण झाली बेपत्ता
 


दरम्यान, दोन ऑगस्टच्या सकाळी अमित साहू याने सना खान यांची बेसबॉल बॅट ने वार करून हत्या केल्यानंतर सना खान यांचे मृतदेह हिरण नदीत फेकून दिले होते. मात्र त्यापूर्वी अमित साहू यांच्या घरी आलेल्या एका मोलकरीणने सना खान यांचे रक्ताच्या थारोळ्यात पडलेले आणि कार्पेट मध्ये गुंडाळलेले मृतदेह पाहिले होते. तेव्हापासून ही मोलकरी अचानकपणे बेपत्ता झाली होती. दोन दिवसांपूर्वी नागपूर पोलिसांना ती महिला सापडली असून तिला जबलपूर मधून नागपूरात आणण्यात आले आहे.


 


सना खान हत्या प्रकरण नेमकं काय?


महाराष्ट्रासह देशभरात थरकाप भरविणारी घटना घडली, ती म्हणजे भाजप नेत्या सना खान हत्याकांड, सना खान या पश्चिम नागपुरातील भाजपच्या स्थानिक कार्यकर्त्या होत्या. 1 ऑगस्ट रोजी त्या जबलपूरमध्ये बिझनेस ट्रिपला गेल्या होत्या, तेव्हापासून त्या बेपत्ता होत्या. जबलपूरमधील हॉटेल व्यवसायिक अमित साहू उर्फ पप्पूसोबत त्यांची मैत्री होती. काही जण दोघांनी लग्न केल्याचाही दावा करतात. त्याच अमित साहूसोबत 1 ऑगस्टच्या संध्याकाळी सना खान यांचं व्हिडीओ कॉलवर जोरदार भांडण झालं. कधीकाळी अमित साहूला भेट म्हणून दिलेली सोन्याची चेन त्याच्या गळ्यात दिसून न आल्यामुळेच रागवलेल्या सना खान यांनी जबलपूरचा मार्ग धरला होता. सना खान या जबलपूरला पोहोचल्यावर दुसऱ्या दिवशी सकाळी सात वाजता त्यांनी नागपुरातील आपल्या कुटुंबीयांना फोन केला होता. यावेळी त्यांनी त्यांच्या घरच्यांना सुखरुप पोहोचल्याचं कळवलं होतं.  पण, सनाने त्यांच्या घरच्यांना फोन करुन कळवल्यानंतर त्यांचा फोन बंद झाला आणि त्यादेखील पुन्हा परतल्याच नाहीत. त्यानंतर अमित साहूने हत्या केल्याची कबुली दिली होती.


 


हेही वाचा>>>


Sana Khan Case: सना खान यांच्याकडे तीन मोबाईल होते, आरोपींनी नष्ट नाही केले, लपवलेत; सना खान यांच्या आईचा खळबळजनक दावा