हिंगोली :  हिंगोली  (Hingoli) शहरातील एका खासगी कुरिअर कंपनीमध्ये काम करणाऱ्या एका कुरिअर बॉयने त्याच्या सहकारी मित्रासह बंदुकीचा धाक दाखवून दरोडा टाकला आहे.  यामध्ये दोन आरोपींना साडे चार लाख  रुपयांच्या मुद्देमालासह पोलिसांनी अटक केले आहे 


हिंगोली शहरांमध्ये  30 डिसेंबर 2021 रोजी बियाणी नगर भागात तीन वाजताच्या सुमारास एसबीआय शाखेमध्ये बँक मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या कल्याणकर यांच्या घरामध्ये एकटे असल्याचे फायदा घेत चोरट्यांनी घरावर दरोडा टाकला. घरात प्रवेश करून पिस्तुलाचा धाक दाखवून अविनाश यांची पत्नी अंजली यांना गंभीर दुखापत करून व त्यांचे हात-पाय बांधून चोरट्यांनी घरातील साहित्यासह रोख रकमेवर डल्ला मारला.


 अखेर पोलिसांनी या घटनेचा छडा लावत दोन चोरट्यांना ताब्यात घेतले आहे. चोरट्यांकडून दोन  पिस्तूल व एक जीवंत काडतूस  आणि सोन्याचे दागिने असा एकूण साडेचार लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. या दोघांपैकी एक जण हा घरी नेहमी ऑनलाईन शॉपिंग केलेले पार्सल द्यायला नेहमीच जायचा त्यामुळे त्याने हा दरोड्याचा कट रचला हे पोलीस तपासात उघड झाले आहे. पोलीस अधीक्षक राकेश कलासागर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने ही कारवाई केली आहे. या घटनेने हिंगोली शहरात खळबळ उडाली आहे. 


LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha



हे देखील वाचा-