Nanded Crime News : नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षात गुन्हेगारीचे प्रमाण वाढत असल्याचे चित्र आहे. तर गुन्हेगारही अपडेट होत, पिस्तुल,बंदूकीचा सर्रास वापर करत असल्याचा घटना घडल्या आहेत. तर शहरात तसेच जिल्ह्यात व्यावसायिक, उद्योजक यांच्यावर गोळीबार करत लुटण्याचे व हत्या झाल्याच्या घटना घडल्या आहेत. तसेच दहशत पसरवण्याचा प्रयत्न करण्यात येतोय. अशा प्रकारच्या घटनांना आळा घालण्यासाठी पोलिसांनी कोंबिग ऑपरेशन करत गुन्हेगारांकडून अनेक हत्यारे, पिस्तुल हस्तगत केल्या आहेत. तसेच या प्रकरणी गुन्हेगारांना बेड्या ठोकल्या आहेत.


नांदेड जिल्ह्यात गेल्या तीन वर्षातील गोळीबाराच्या घटना 


2019-गोळीबार घटना-05  गुन्हे नोंद-05, अटक आरोपी -24, तर जप्त केलेली अग्निशस्त्र(पिस्तुल)-05, जिवंत काडतुसे-08 आहेत.


2020 या वर्षात गोळीबाराच्या घटना-04 , गुन्हे नोंद-04,अटक आरोपी 26, जप्त केलेली पिस्तुल-06,तर जिवंत काडतुसे-16 आहेत.


2021 या वर्षात गोळीबाराच्या घटना-05, गुन्हे नोंद-05,अटक केलेले आरोपी-25, जप्त पिस्तुल-07,तर जप्त केलेली जिवंत काडतुसे-03 आहेत.


2022 वर्षांच्या एप्रिल महिन्यापर्यत गोळीबाराच्या 02 घटना घडल्या असून यात 4 आरोपीना ताब्यात घेण्यात आलेय. तर दोन गुन्हे दाखल असून एक पिस्तुल पोलिसांनी जप्त केलेय.


आतापर्यंत 79 आरोपींना पोलिसांनी ठोकल्या बेड्या 
2019 ते 2022 या तीन वर्षांच्या कालावधीत नांदेड जिल्ह्यात 16 गोळीबाराच्या घटना घडल्या असून ,19 पिस्तुल पोलिसांनी जप्त केले आहेत. तर यात 16 गुन्ह्यांची नोंद असून आता पर्यंत 79 आरोपींना पोलिसांनी बेड्या ठोकल्या असून यांच्या कडून 27 जिवंत काडतुसे हस्तगत केली आहेत.


महत्त्वाच्या इतर बातम्या :