Indore MP Crime : ही बातमी मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) पोलिस विभागाची आहे. जी वाचून तुम्हालाही धक्का बसेल. एका विदेशी आरोपीमुळे पोलिसांना 5 लाख रुपयांचा फटका बसला आहे. एका नायजेरियन आरोपीला मध्य प्रदेशातील इंदूर येथील पोलीस ठाण्यात ठेवणे पोलिसांना चांगलेच महागात पडले. या तरुणाला त्याच्या देशात परत पाठवण्यासाठी पोलिसांना 5 लाख रुपयांपर्यंत खर्च करावा लागला.
62 वर्षीय वृद्ध महिलेची ऑनलाइन फसवणूक
याबाबत माहिती अशी की, एका नायजेरियन तरुणाने इंदूर शहरातील एका 62 वर्षीय वृद्ध महिलेची ऑनलाइन फसवणूक केली होती. इंदूरच्या सायबर सेलने ऑनलाइन फसवणुकीत आरोपी 'विस्डम ओबिन्ना चिमिझी' याला दिल्लीतून अटक केली होती. सायबर तपासानंतर या नायजेरियन आरोपीने जवळपास दोन वर्षे तुरुंगात घालवल्यानंतर विस्डमच्या वकिलाने खटला लढवला. आरोपींविरुद्ध ज्या कलमांखाली गुन्हा दाखल करण्यात आला होता, त्याचा एकही पुरावा पोलिसांना न्यायालयात सादर करता आला नाही.
व्हिसा न मिळाल्याने आरोपीला पाहुणे म्हणून ठेवावे लागले
त्यानंतर 5 महिन्यांपूर्वी न्यायालयाने आरोपी विस्डमची निर्दोष मुक्तता केली. गेल्या पाच महिन्यांपासून व्हिसा न मिळाल्याने त्यांना पाहुणे म्हणून ठेवावे लागले. पोलिसांनी मोबाईल सिम आणि आयपी ॲड्रेसच्या आधारे नायजेरियनला आरोपी केले आणि त्याला दोन वर्षांसाठी तुरुंगात पाठवले. एवढेच नव्हे तर निर्दोष सुटल्यानंतर त्याचा व्हिसा आणि आपत्कालीन प्रवासाचे प्रमाणपत्र न मिळाल्याने पोलिसांना त्याला पोलिस ठाण्यात पाहुण्याप्रमाणे खोली देऊन सरकारी खर्चाने जेवण, तसेच राहण्याची व्यवस्था करावी लागली. 4 महिने त्याच्या देखरेखीखाली एक रक्षकही ठेवावा लागला.
28 फेब्रुवारीला हद्दपार होणार
इंदूरचे अतिरिक्त उपायुक्त राजेश दंडोतिया यांनी सांगितले की, सायबर सेलमध्ये ऑनलाइन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणातील आरोपी तुरुंगात होता. आता आरोपीचा गुन्हा सिद्ध न झाल्याने न्यायालयाने त्याची निर्दोष मुक्तता केली आहे. तुरुंगातून सुटलेल्या नायजेरियन व्यक्तीकडे वैध पासपोर्ट नसल्याने दूतावासाशी सातत्याने चर्चा सुरू होती. हा परदेशी नागरिक जवळपास 5 महिने डिटेंशन सेंटरमध्ये होता. आता त्याच्या पासपोर्टची वैधता वाढवण्यात आली आहे, त्यामुळे त्याला 28 फेब्रुवारीला हद्दपार करावे लागेल.
6 वर्षांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर आला नायजेरियन, महाराष्ट्रातील तरुणीशी लग्न, मग झाला गुंड
महाराष्ट्रातील नागपूरमध्ये काही दिवसांपूर्वी आणखी नायजेरिएन आरोपीशी संबधित प्रकरण समोर आले होते, एक नायजेरियन तरुण सहा वर्षांपूर्वी टुरिस्ट व्हिसावर भारतात आला होता. त्याने महाराष्ट्रातील एका मुलीशी लग्न केले. यानंतर तो फसवणूक करणारा गुंड बनला. पोलिसांनी आरोपी नायजेरियनला अटक केली. त्याने एका औषध विक्रेत्याची सुमारे 16 लाख रुपयांची फसवणूक केल्याचा आरोप आहे.
हेही वाचा>>>