Crime West Bengal : पश्चिम बंगालमधील हुगळी (hugali) जिल्ह्यात इयत्ता चौथीत शिकणाऱ्या विद्यार्थी श्रेयांशु शर्माच्या हत्येच्या प्रकरणाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या खून प्रकरणात पोलिसांनी खळबळजनक खुलासा करत मुलाची आई आणि तिच्या समलैंगिक जोडीदाराला अटक केली आहे. दोघांनी मिळून 10 वर्षीय विद्यार्थ्याची निर्घृण हत्या केली होती.


 


...आणि घरातून अचानक किंचाळण्याचा आवाज आला


बंगालची राजधानी कोलकाता पासून सुमारे 17 किलोमीटर अंतरावर उत्तरपाडा हे गाव आहे. रविवारी 18 फेब्रुवारीला संध्याकाळी येथील एका घरातून अचानक किंचाळण्याचा आवाज आला. तेव्हा चौथीत शिकणाऱ्या अवघ्या 10 वर्षाच्या चिमुकल्याची कोणीतरी हत्या केल्याचे उघड झाले. हा खून अतिशय निघृणपणे करण्यात आला असून या चिमुकल्याच्या डोक्यावर विटा तसेच इतर जड वस्तूने वार करण्यात आला होता, हाताच्या नसा कापल्या होत्या. या घटनेनंतर कुटुंबीयांना धक्का बसला.



चिमुकल्याच्या हत्येमागे नेमके कारण काय?


हत्येची माहिती मिळताच उत्तरपाडा पोलीस घटनास्थळी पोहोचले. पोलिसांसह तज्ज्ञांचे पथकही घटनास्थळाची पाहणी करून पुरावे गोळा करण्यासाठी आले होते. या प्रकरणाचा तपास तातडीने सुरू करण्यात आला. पण एवढ्या चिमुकल्याच्या हत्येमागे नेमके कारण काय असू शकते, हे कोणालाच समजत नाही. घरात कोणी नसताना नराधमाने श्रेयांशुची हत्या केली होती. श्रेयांशुचे आई-वडील दोघेही नोकरी करतात. योगायोगाने घटनेच्या वेळी दोघेही घराबाहेर होते, तर घरातील इतर सदस्यही काही काळासाठी बाहेर गेले होते. दरम्यान, मारेकऱ्याने घरावर हल्ला करून श्रेयांशुची हत्या केली.


 


पोलिसांना सुरुवातीच्या तपासातच काही गोष्टी लक्षात आल्या


या प्रकरणाचा तपास करण्यासाठी घटनास्थळी पोहोचलेल्या पोलिसांना सुरुवातीच्या तपासातच काही गोष्टी लक्षात आल्या. पोलिसांच्या नजरेत खुन्याचा घरात प्रवेश हा मैत्रीपूर्ण उद्देशाने असावा. म्हणजेच, आजूबाजूला कोणीही अनोळखी व्यक्ती जबरदस्तीने घरात शिरताना दिसली नाही, दारावर तोडफोड किंवा जबरदस्तीने प्रवेश केल्याचेही कोणतेही चिन्ह नाही. घटनेच्या वेळी घरातील पाळीव कुत्राही मोकाट असल्याचे पोलिसांकडून समजते. श्रेयांशुच्या घरात एक कुत्रा देखील होता, जो कोणीही अनोळखी व्यक्ती दिसला की लगेच भुंकायला लागला, पण आश्चर्याची गोष्ट म्हणजे त्याच घरात श्रेयांशुचा खून झाला आणि कुत्र्याचे भुंकणे देखील कोणी ऐकले नाही. सामानही मूळ जागेवर ठेवले होते. असे काही प्रश्न घेऊन पोलीस चौकशी करू लागतात. त्यानंतर जी कथा समोर येते, त्यावर पोलिसांचाही विश्वास बसणे कठीण होते. मुलाची आई शांता शर्मा हिचे मैत्रीण इशरतसोबत समलैंगिक संबंध असल्याचे समोर आले आहे. शांताच्या लग्नाआधीपासूनच दोघांमध्ये नाते सुरू होते. इशरत पोलिसांना सांगते की, शांताचा पती पंकजलाही या नात्याची माहिती होती, तरीही ही गोष्ट कधीच बाहेर आली नाही. मात्र काही दिवसांपूर्वी शांताचा चार वर्षांचा मुलगा श्रेयांशु याने वडिल पंकजला सांगितले की, इशरत त्याच्या आईसोबत आक्षेपार्ह स्थितीत होती. जे त्या चिमुरड्याने पाहिले होते. त्या दिवसापासून इशरत आणि शांता या दोघीही चिंतेत होत्या 



आईनेच घोटला चिमुरड्याचा गळा


असे झाले तर समाजातील त्यांच्या बद्दल बदनामी होईल. यामुळे इशरत आणि मुलाची आई शांता यांनी श्रेयांशुची हत्या करण्याचा निर्णय घेतला. इशरतसोबतच मुलाच्या आईनेही स्वत:च्या निष्पाप मुलाला मारण्याचे मान्य केले. यानंतर पूर्ण नियोजनानुसार 18 फेब्रुवारीच्या रात्री दोघांनी मिळून श्रेयांशुवर हल्ला केला. दोघांनी आधी श्रेयांशुच्या डोक्यात वीट मारली. त्यानंतर घरात ठेवलेली गणेशमूर्ती उचलून त्याच्यावर हल्ला केला. तुटलेल्या टेबलानेही त्याला चिरडण्याचा प्रयत्न केला. यानंतरही आई व तिच्या मैत्रिणीचे समाधान न झाल्याने दोघांनी घरात ठेवलेल्या किचनच्या चाकूने निरागस मुलाच्या हाताच्या नसा कापल्या. रक्तस्त्राव होऊन त्याचा मृत्यू होईल याची खात्री करण्यासाठी त्याच्यावर एकामागून एक अनेक वार करण्यात आले. पोलिसांनी या प्रकरणाचा खुलासा केल्यावर या खुनाच्या घटनेत मुलाच्या आईचाच सहभाग असल्याच्या कथेवर विश्वास ठेवणे लोकांना कठीण झाले आहे. परंतु पोलिसांकडे इशरत परवीन तसेच आई शांता शर्मा यांच्याविरुद्ध मोबाईल कॉल डिटेल्स, सीडीआर, गुन्ह्याच्या ठिकाणी उपस्थित असलेल्या बोटांचे ठसे आणि हेतू या संदर्भात अनेक पुरावे होते. उत्तरपाडा पोलिसांनी एका निष्पाप मुलाच्या हत्येची ही घटना अतिशय संतापजनक पद्धतीने उघडकीस आणली असली तरी या हत्येमागची कहाणी समजल्यानंतर संपूर्ण परिसर हादरला आहे. यावर कोणाचाही सहज विश्वास बसत नाही.


 


हेही वाचा>>>


अकॅडमीच्या संचालकने 'तू काळी आहेस' म्हणून हिणवले, तरुणीने संपवलं जीवन; पोलिसांत गुन्हा दाखल