मुंबई: लोकसभा निवडणुकांची रणधुमाळी सुरू असतानाच पुन्हा मालेगाव स्फोट प्रकरणाचा (Malegaon Blast Case Update)  मुद्दा ऐरणीवर आला. या प्रकरणात आरएसएस, विश्व हिंदू परिषद आणि योगी आदित्यनाथ यांच्यावर थेट आरोप करायला लावले गेले असं आरोपी लेफ्टनंट कर्नल पुरोहित यांनी एनआयए कोर्टात म्हटलं. आपल्या 23 पानी लेखी जबाबात त्यांनी यासह अनेक मुद्दे नमूद केले आहेत. एटीएसनं राजकीय दबावापोटी खोटी केस दाखल केल्याचा पुरोहितांनी आरोप केलाय. 


कर्नल पुरोहित यांचं आतपर्यंतचे म्हणणं काय?


1. मी मिलिटरी इंटेलिजन्समध्ये काम करत होतो.
2. अभिनव भारत या संस्थेवर लक्ष ठेवणे माझ्या कामाचा भाग होता.
3. मी माझ्या कर्तव्याचा व नोकरीचा भाग म्हणून मालेगाव ब्लास्ट प्रकरणातील आरोपींवर लक्ष ठेवून होतो.
4. आरोपींनी घेतलेल्या बैठकांना मी माहिती जमवण्यासाठी हजर राहिलो.
5. हेरगिरीची जबाबदारी म्हणून मी सर्व बैठकांना हजर होतो.
6. माझ्या वरिष्ठ अधिकाऱ्यांना माझ्या कामाची माहिती होती.
7. मी करत असलेले काम माझ्या लष्करातील वरिष्ठ अधिकाऱ्यांना माहिती होतं.
8. तसेच मला मिळणारी माहिती मी सर्व वरिष्ठ अधिकाऱ्यांना पोहचवत होतो.
9. इतर आरोपींनी सांगितलं की मी बैठकांना हजर होतो आणि त्यामुळे मलाही आरोपी करणं चुकीचं.
10. मी माझ्या कामाचा भाग म्हणून आरोपींच्या बैठकांना हजर होतो.
11. 29 सप्टेंबर 2008 रोजी मालेगाव ब्लास्ट झाले, मी लष्कराचा अधिकारी असल्यामुळे मालेगाव ब्लास्ट प्रकरणी एक कोर्ट ऑफ एन्क्वॉयरी लष्कराने सुरू केली होती.
12. त्या कोर्ट ऑफ एन्क्वॉयरीमध्ये अनेक साक्षीदारांनी पुरोहित यांच्या समर्थनार्थ साक्ष दिली 
13. 2012 मध्ये court of inquiry पूर्ण झाली. 
14. मी लष्कराचा अधिकारी असल्यामुळे माझ्या विरोधात गुन्हा दाखल करण्यापूर्वी फौजदारी दंड प्रक्रिया संहिता कलम 197 नुसार लष्कराकडून पूर्वपरवानगी घेणे आवश्यक होते.
15. माझ्यावर गुन्हा दाखल करताना लष्कराची पूर्वपरवानगी घेतली गेली नव्हती. 
16. माझे कमांडींग ऑफिसर लेफ्टनंट कर्नल राजशेखरन यांनी 16 जानेवारी 2008 रोजी दिलेले गोपनीय पत्र माझं म्हणणं सिद्ध करणारे आहे. 
17. ब्रिगेडियर एस. एस. चहल (मिलिटरी इंटेलिजन्स) यांनी 2 एप्रिल 2018 रोजी आर्मीचे उपप्रमुख यांना गोपनीय पत्र लिहिलं. 
18. मिलिटरी इंटेलिजन्सचे कर्नल एम. एस. गिल यांनी वाईस चीफ ऑफ आर्मी यांना 8 फेब्रुवारी 2019 रोजी पत्र लिहिलं.  
19. या गोपनीय पत्रांमध्ये हे स्पष्ट लिहिलेले होतं की मला इंटेलिजन्सकडून अभिनव भारत नावाच्या हिंदू संघटनेच्या कारवायाविषयी माहिती गोळा करण्याची जबाबदारी देण्यात आली होती.
20. मी माझ्या कर्तव्याचा भाग म्हणून काम केलं. 


ही बातमी वाचा: