Lady Doctor Cut Off Private part of Lover : बिहारच्या सारणमधून एक धक्कादायक बातमी समोर आलीये. एकिकडे देशात नवे कायदे लागू केले जात असताना दुसरीकडे मोठं गुन्हेगारी कृत्य समोर आलं आहे. मढौरा येथील एका कथित खासगी डॉक्टरने प्रियकर नगरसेवकाने प्रेमात धोका दिल्याने त्याचे गुप्तांग कापले आहे. पोलिसांना याबाबतची माहिती मिळाल्यानंतर त्याला रेफरल रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर प्रकरण गंभीर असल्याने प्राथमिक उपचार झाल्यानंतर त्याला छपरा येथे हलवण्यात आले आहे. 


अधिकची माहिती अशी की, बिहारच्या छपरा येथील महिला डॉक्टरचे एका नगरसेवकाशी प्रेम संबंध होते. नगरसेवकाने डॉक्टर महिलेला लग्नाचं आश्वासन दिलं होतं. महिलेने लग्नासाठी तारखाही काढल्या होत्या. मात्र, नगरसेवक विवाहस्थळी आलाच नाही. 1 जुलै रोजी दोघांचं लग्न होणार होतं. पण नगरसेवक तिच्या घरी पोहोचलाच नाही. नगरसेवक विवाह करणे टाळत असल्याचे समजल्यानंतर महिलेने नगरसेवकाचे गुप्तांग कापले आहे. 


आरोपी महिला डॉक्टरने काय म्हटलं? 


महिला डॉक्टरने पोलिसांना सांगितले की, तिचे वर्षभरापासून प्रेमसंबंध होते. प्रियकर नगरसेवकासोबत तिचे शारीरिक संबंध होते. मात्र, लग्न करण्यास सातत्याने नकार द्यायचा किंवा लग्नाबाबत बोलणे टाळायचा. प्रियकर नगरसेवकासोबत सोमवारी (दि.1) सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास वाद झाला. त्यानंतर मी त्याचा प्रायवेट पार्ट कापून बाथरुममध्ये टाकला. सारणचे पोलीस अधीक्षक डॉ. कुमार आशिष म्हणाले की, आज सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली आहे. महिलेचे प्रियकरासोबत अनेक वर्षांपासून प्रेम संबंध होते. लग्नाबाबत बोलणे झाले, मात्र त्याने लग्नास सात ते आठ वेळेस नकार दिल्याचे तिने सांगितले.


नवीन कायद्यानुसार गुन्हे दाखल होतील : एस.पी 


पुढे बोलताना पोलिस अधिक्षक म्हणाले, घटनेची माहिती मिळताच पोलीस तात्काळ तेथे पोहोचले. घटनास्थळावरून तेथे असलेला चाकू जप्त करण्यात आला असून त्यासोबत महिलेलाही ताब्यात घेण्यात आले आहे. जखमीवर उपचार सुरू असून त्यांची प्रकृती ठीक आहे. याबाबत आम्ही पुढील कार्यवाही करत आहोत.


इतर महत्वाच्या बातम्या


Ladki Bahin Yojana : खळबळजनक! अमरावती पाठोपाठ अकोल्यातही तलाठ्याकडून लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थ्यांची आर्थिक लूट