कोल्हापुर : मशिदीच्या संचालक मंडळाच्या वर्चस्व वादातून एकावर तलवारीने सपासप वार करून गंभीर जखमी केल्याची धक्कादायक घटना कोल्हापुरात (Kolhapur Crime) घडली आहे. या हल्ल्यात महंमदखान तोता खान पठाण (वय 52) हे जखमी झाले असून सध्या त्यांची प्रकृती गंभीर आहे. 


कोल्हापूर शहरातील सदर बाजार परिसरातील (Kolhapur Sadar Bazar) असणाऱ्या एका मशिदीच्या संचालक मंडळाच्या वर्चस्व वादातून गेल्या काही दिवसांपासून दोन गटांमध्ये धूसफूस सुरू आहे.  या वादाचा आज भडका उडाला असून, शनिवारी  दुपारच्या दरम्यान तीन ते चार हल्लेखोरांनी महंमदखान तोता खान पठाण यांच्यावर तलवारीने हल्ला केला. या हल्ल्यामध्ये पठाण गंभीर जखमी झाले असून त्यांना शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं आहे.  


या घटनेची माहिती मिळतात शाहूपुरी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत तपास सुरू केला आहे. दरम्यान भर दिवसा घडलेल्या तलवार हल्याने सदर बाजार परिसरामध्ये एकच खळबळ उडाली असून वातावरण तणावपूर्ण बनले आहे. सध्या या परिसरात पुढील धोका टाळण्यासाठी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.


आधी अपहरण केलं, मग निर्घुणपणे संपवलं


पूर्ववैमनस्यातून नालासोपाऱ्यात  27 वर्षांच्या तरुणाचं अपहरण करून, त्याची धारदार हत्यारानं वार करून हत्या केली असल्याची धक्कादायक घटना वसईत घडली. शुक्रवारी 12 जानेवारी 2024 रोजी उघड झालेल्या घटनेनं संपूर्ण वसई शहर हाजरुन गेलं आहे. दोन रिक्षांमधून आलेल्या 9 ते 10 जणांच्या टोळक्यानं तरुणाचं अपहरण करुन हत्या केल्याचं उघड झालं आहे. धक्कादायक बाब म्हणजे, टोळक्यानं सर्वात आधी 27 वर्षीय तरुणाचं अपहरण केलं. त्यानंतर त्याची हत्या केली आणि हत्येनंतर मृतदेह रस्त्यावर फेकून सर्व आरोपी फरार झाले. 


हत्येच्या घटनेनं वसई शहर पूरतं हादरुन गेलं आहे. माणसं जमवून, अपहरण करून, निर्घृणपणे हत्या केल्याप्रकरणी पेल्हार पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या गुन्ह्यातील आरोपींच्या तपासासाठी पोलीस आयुक्तालयातही गुन्हे शाखेच्या 4 आणि पेल्हार पोलीस ठाण्याच्या तीन टीम रवाना झाल्या आहेत. 


आरोपींनी पूर्ववैमनस्यातून अपहरण करून तरुणाची हत्या केल्याची प्राथमिक माहिती पोलीस तपासात समोर आली आहे. आम्ही गुन्हा दाखल करून, गुन्हे शाखेच्या 3, मध्यवर्ती गुन्हे शाखा 01, आणि आमच्या तीन अशा 7 वेगवेगळ्या टीम आरोपींचा शोध घेत आहेत. दोघांची ओळख पटली आहे. आम्ही लवकरच आरोपी पकडण्यात यश मिळवू, असं आश्वासन पोलिसांच्या वतीनं देण्यात आलं आहे. 


ही बातमी वाचा: