कोल्हापूर : गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेत असलेल्या करवीर निवासिनी श्री अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा (Development Plan of Ambabai Mandir) अखेर सादर झाला आहे. उपमुख्यमंत्री अजित पवार आणि कोल्हापूरचे (Kolhapur) पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्यासमोर आराखड्याचे सादरीकरण करण्यात आले. तब्बल साडेचार एकरात अंबाबाई मंदिराचा विकास करण्यात येणार आहे.


अंबाबाई मंदिराच्या चारी बाजूने विकास केला जाणार (Development Plan of Ambabai Mandir) 


भाविकांना अधिकाधिक सेवा देण्यासाठी करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या चारही बाजूने विकास केला जाणार आहे. यामध्ये मंदिर परिसर असलेल्या बिनखांबी गणेश मंदिर, जोतिबा रोड, भाऊसिंगजी रोड, भवानी मंडप, दक्षिण दरवाजा या साडेचार एकराच्या परिसरात आराखडा राबविण्यात येणार आहे. मंदिर परिसराच्या विकासासाठी साधारण एक हजार कोटी रुपयांची तरतूद केली जाणार आहे. 


कसा असेल विकास आराखडा (Development Plan of Ambabai Mandir) 



  • बिनखांबी गणेश मंदिर ते महालक्ष्मी बँकेपर्यंत भुयारी मार्ग 

  • भुयारी मार्गाच्या पुढे दोन मजल्यांचा प्लाझा असेल 

  • याप्लाझा मध्ये दर्शन मंडप, ऍम्पी थिएटर, दुकाने, स्वच्छतागृह अशा सुविधा असतील

  • संकन प्लाझा याठिकाणी 4 हजार भाविक बसतील आणि 1 हजार भाविक उभा राहतील अशी व्यवस्था

  • भाविकांना बिनखांबी गणेश मंदिराजवळ सोडले जाईल तिथून भुयारी मार्गे संकन प्लाझामध्ये प्रवेश होईल

  • संकन प्लाझाच्या शेजारी 330 चारचाकी, 650 दुचाकी आणि 7 बसच्या पार्किंगची सोय आहे


सर्वांना विश्वासात घेऊन विकास आराखडा राबवणार 


अंबाबाई मंदिर परिसराचा विकास करत असताना साधारण 350 दुकाने आणि घरांना नोटीस पाठवली आहे. भूसंपादन करण्यासाठी मंदिर परिसरातील नागरिकांनी सहकार्य दाखवलं आहे. त्यामुळे संबंधितांचे समाधान झाल्यानंतरच भूसंपादनाचे काम सुरू केले जाईल अशी माहिती कोल्हापूरचे जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी दिली आहे.


अंबाबाई मंदिराच्या विकासामुळे कोल्हापूरच्या वैभवामध्ये आणखी भर पडणार


करवीर निवासिनी अंबाबाई मंदिराच्या विकासामुळे कोल्हापूरच्या वैभवामध्ये आणखी भर पडणार आहे. कोल्हापूरमध्ये देवीच्या दर्शनासाठी येणाऱ्या भाविकांमध्ये प्रचंड वाढ होणार आहे. त्यामुळे आई अंबाबाईच्या मंदिराचा विकास तातडीने व्हावा अशी सर्वच कोल्हापूरकरांची इच्छा आहे.


इतर महत्वाच्या बातम्या