Kolhapur Crime News कोल्हापूर : करवीर तालुक्यातील कुडित्रे (Kuditre) गावात एक धक्कादायक घटना घडली आहे. माथेफिरुकडून लाकडी दांडक्याने मारहाण करून वृद्धाचा खून करण्यात आला आहे. संशयित आरोपीला पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. 


याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, जंबा भगवंत साठे (65) (Jamba Bhagwant Sathe) हे गावातील चौकात गावकऱ्यांसोबत बोलत थांबले होते. गावातील रतन भास्कर हा मद्यपी माथेफिरू तरूण हातात लाकडी दंडुका तिथे पोहोचला. त्याने बोलत उभे असलेल्या चौघातील जंम्बा साठे यांच्या डोक्यावर हातातील दंडुक्याने हल्ला केला. त्यानंतर सलग आठ ते दहा वेळा डोक्यात दंडुका घातला. त्यामुळे जम्बा साठे यांचा जागीच मृत्यू झाला.


संशयित एका शेतकऱ्याची दुचाकी घेऊन फरार


संशयित हल्लेखोर रतन बाळासाहेब भास्कर (Ratan Balasaheb Bhaskar) हा एका शेतकऱ्याची दुचाकी घेऊन पळून गेला होता. घटनेची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मारेकऱ्याला अटक केल्याशिवाय मृतदेह उचलू देणार नाही, अशी भूमिका नातेवाईकांनी घेतली. यामुळे गावात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. 


पोलिसांनी संशयिताला घेतले ताब्यात


त्यानंतर पोलीस निरीक्षक किशोर शिंदे (Kishore Shinde) यांनी नातेवाईकांची समजूत काढली. या वादात मृतदेह तीन तास जागेवरच होता. पोलिसांनी याप्रकरणी गुन्हा नोंदवत तपास सुरु केला. करवीर पोलिसांनी पळून गेलेल्या हल्लेखोर रतन भास्करला ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलीस करीत आहेत.


संशयित गुन्हेगारी प्रवृत्तीचा


दरम्यान, संशयित रतन भास्कर हा गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याच्यावर दहा वर्षांपूर्वी बलात्काराचा गुन्हा दाखल झाला होता. त्याला गांजा आणि दारुचे व्यसन असल्याची स्थानिक नागरिकांनी दिली आहे. ही हत्या कुठल्या कारणावरून झाली याबाबत अद्याप स्पष्टता नाही. 


हिंगोलीत अनैतिक संबंधातील वादातून दिव्यांगाची हत्या 


अनैतिक संबंधातील वादातून एका दिव्यांग इसमाच्या डोक्यात दगड घालून हत्या (murder) केल्याची घटना समोर आली आहे. हिंगोली (Crime News) जिल्ह्यातील केळी या गावात ही घटना घडली आहे. केळी गावातील रहिवासी असलेल्या व्यंकटी सांगळे या 35 वर्षीय दिव्यांग इसमाचा डोक्यात दगड घालून खून केल्याची घटना उघडकीस आली. या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणी हिंगोली शहर पोलीस ठाण्यामध्ये मारेकऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 


आणखी वाचा 


Ashok Chavan Resign: अशोक चव्हाण यांच्या राजीनाम्याची प्रत माझाच्या हाती, पत्रात नेमकं काय म्हटले?