Kolhapur Crime News : कोल्हापुरातील कसबा बावड्यात धक्कादायक घटना समोर आलीय. बावड्यातील शहाजीनगरमध्ये गळा चिरून महिलेची हत्या करण्यात आलीय. कविता प्रमोद जाधव (वय 44, रा. तारळे, ता. राधानगरी, जि. कोल्हापूर) असे हत्या झालेल्या माहिलेचे नाव आहे. संशयिताने कोयत्याने कविता यांचा गळा चिरून त्यांची हत्या केलीय. हत्या करून फरार होण्याच्या प्रयत्नात असलेल्या राकेश शामराव संकपाळ (वय 32, रा. शहाजीगर, कसबा बावडा) याला पोलिस अधिकारी किरण भोसले यांनी पाठलाग करून पकडले आहे. शाहुपुरी पोलीस ठाण्यात या हत्येबाबत संकपाळ याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आलाय.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, कसबा बावडा येथील लाईन बझार येथे राहणाऱ्या राकेश याचा फर्निचरचा व्यवसाय आहे. कविता या त्याच्या नात्यातीलच असल्याने या दोघांची ओळख होती. चार वर्षापूर्वी कविता यांच्या पतीचा मृत्यू झाला आहे. त्यावेळीपासून त्या शिवणकाम व इतर रोजगार करून कुटुंबाचा उदरविर्वाह चालवत होत्या. आरोपी राकेश संकपाळ याने कविताचे पती मयत झाल्यापासून तिच्या घरी येणे- जाणे वाढवून तिच्यासोबत चांगले संबंध निर्माण केले होते. त्यातून दोघे एकमेकांकडे येत जात होते. दोघांचे संबंध वाढल्याने आरोपी राकेश याने तिला आपल्यासोबत लग्न करण्याची मागणी करत रोता. परंतु कविता लग्न करण्यास तयार नव्हती. यातून दोघांमध्ये वारंवार वाद होत असत.
घरी बालून केला घात
राकेश याने कविता यांना आज त्याच्या बावड्यातील राहत्या घरी बोलावू घेतले. कविता त्याच्या घरी आल्यांतर त्याने पुन्हा त्यांच्याकडे लग्नाची मागणी केली. परंतु, आज देखील कविताने आपल्यााला मुले असल्यामुळे आपण लग्न करू शकत नसल्याचे सांगितले. लग्नाला नकार दिल्यामुळे चिडलेल्या राकेश याने कविताच्या गळ्यावर कोयत्याने वार केले. कविता यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर मृतहेद घरातच सोडून त्याने तेथून पळ काढला. परंतु, पोलिसांना याची माहिती मिळताच पाठलाग करून पळून जाणाऱ्या राकेश याला पकडण्यात आले.
पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर राकेश याने प्रथम उडवा-उडवीची उत्तरे दिली. परंतु, पोलिसी खाक्या दाखवताच त्याने खूनाची कबुली दिली. राकेश याच्यावर शाहुपूरी पोलिस ठाण्यात खूनाच गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिस घटनेचा अधिक तपास करत आहेत.
महत्वाच्या बातम्या