Beed News Update : दारूच्या नशेत 112 नंबर डायल करून पत्नी आत्महत्या करत असल्याची खोटी माहिती पोलिसांना देणाऱ्या एका व्यक्तीला बीडच्या धारूर पोलिसांनी अटक केली आहे. नवनाथ तिडके असं पोलिसांनी अटक केलेल्या संशयित आरोपीचं नाव आहे. 


 नवनाथ विठ्ठल तिडके हा बीड जिल्ह्यातील धारूर तालुक्यातील भोगलवाडी गावात राहतो. त्याने मध्यरात्री पोलिसांना 112 नंबर वर कॉल केला आणि माझी बायको घरातून निघून गेली आहे आणि ती आत्महत्या करणार असल्याची माहिती दिली. एकदाच नाहीतर अनेक वेळा या नंबरवर कॉल केला. त्यामुळे धारूर पोलिस तत्काळ भोगलवाडी गावात तिडके याच्या घरी पोहोचले. त्यावेळी नवनाथ तिडके आणि त्याची पत्नी दोघेही एकाच घरात त्यांना आढळून आले. पोलिसांनी अधिक चौकशी केल्यानंतर नवनाथ याने दारूच्या नशेत फोन केल्याचे समोर आले. 


संकट काळामध्ये मदत व्हावी म्हणून पोलिस प्रशासनाकडून 112 नंबर हा हेल्पलाइन नंबर जरी करण्यात आलेला आहे. मात्र दारूच्या शेत असलेल्या नवनाथ तिडके याने याच नंबरवर अनेकदा कॉल केले. त्यामुळे पोलिसांची चांगलीच तारांबळ उडाली होती. 


या सर्व प्रकरणानंतर पोलिसांनी नवनाथ तिडके यांच्याकडे याबद्दल विचारणा केली असता तो दारूच्या नशेत असल्यास आढळून आलं. यातूनच त्याने हा प्रकार केल्याची त्याने पोलिसांकडे कबुली दिली. पोलिस अंमलदार संतोष बहिरवाडी यांच्या फिर्यादीवरून नवनाथ विठ्ठल तिडके याच्यावर बनावट कॉल केल्याप्रकरणी धारूरच्या पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर आज बीडच्या धारून पोलिसांनी त्याला अटक केली. 


संकट काळात नागरिकांना तत्काळ पोलिसांची मदत मिळावी यासाठी प्रशासनाकडून 112 नंबरची हेल्पलाइन जारी करण्यात आली आहे. परंतु, या नंबरवर फोन करून खोटी माहिती सांगणे,  टिंगल करणे असे अनेक प्रकार घडत आहेत. औरंगाबादमध्ये देखील असाच प्रकार काल घडला आहे. औरंगाबादमधील एका व्यक्तीने दारूच्या नशेत 112 वर कॉल करून गोळीबार झाल्याची माहिती दिली. परंतु, ही कृती  त्याला चांगलीच महागात पडली आहे. फोनवरून गोळीबार झाल्याची माहिती देऊन पसार झालेल्या या व्यक्तीला तीन दिवसांनंतर पोलिसांनी शोधून चौकशी केली असता, त्याच्याच घरात गावठी कट्टा आणि दोन जिवंत काडतुसे आढळल्याचे समोर आले. आता पोलिसांनी त्यालाच गजाआड केले असून न्यायालयाने त्याला एक दिवसाची कोठडी सुनावली आहे. संतोष रघुनाथ साबळे असे औरंगाबादमधील आरोपीचे नाव आहे.   


महत्वाच्या बातम्या


Aurangabad: दारूच्या नशेत 112 वर कॉल केला, तपासात पोलिसांना सापडली पिस्टल अन् स्वतःच अडकला 


भयंकर! ज्या विहिरीत पहिल्या पत्नीनं दोन चिमुकल्यांसह जीवनं संपवलं, त्याच विहिरीत दुसऱ्या पत्नीनंही दोन बाळांसह जीव दिला