Kolhapur CPR News: कोल्हापुरातील छत्रपती प्रमिलाराजे (सीपीआर) रुग्णालयातील वैद्यकीय देयक घोटाळ्याप्रकरणीनवीमाहितीसमोरआलीआहे. राज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर (Prakash Abitkar) यांच्या जिल्ह्याती आरोग्य विभागातील दोन मोठ्या अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करण्यातआलीआहे. विद्यमान जिल्हा शल्य चिकित्सक प्रशांत वाडीकर आणि माजी जिल्हा शल्य चिकित्सक सुप्रिया देशमुख यांचे निलंबन करण्यातआलेआहे. वैद्यकीय बिलांच्या फाइल्सच्या मंजुरीसाठी कोणाला किती पैसे दिले, याचा हिशेब असलेल्या नोंदवहीप्रकरणी हिकारवाईकरण्यातआलीआहे. बिलासाठी आर्थिक देवाण-घेवाण झाल्याचा आजी-माजी जिल्हा शल्यचिकित्सकांवर ठपका ठेवण्यातआलाआहे. दरम्यान, एकाच वेळी आजी- माजी जिल्हा शल्य चिकित्सकांवर निलंबनाची कारवाईहोणंहि पहिलीच वेळअसल्याचेबोललंजातआहे.

Continues below advertisement

Kolhapur News: कोल्हापूर जिल्ह्यातील आरोग्यसेवेच्या इतिहासातील पहिलीच घटना

वैद्यकीय बिलांच्या फाइल्सच्या मंजुरीसाठी कोणाला किती पैसे दिले, याचा हिशेब असलेल्या नोंदवहीप्रकरणी आधीच्या जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुप्रिया देशमुख आणि विद्यमान जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रशांत वाडीकर यांना शुक्रवारी निलंबित करण्यात आले आहे. या सर्व प्रकरणामध्ये हे दोन्ही आजी, माजी जिल्हा शल्यचिकित्सक समसमान दोषी असल्याचे चौकशी समितीने अहवालात स्पष्टपणे नमूद केले होते. दरम्यानराज्याचे आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी याप्रकरणी चौकशीसाठी आदेश दिलेहोते. चौकशीसाठी आरोग्य विभागाच्या तीन अधिकाऱ्यांची समिती नेमली होती. चौकशी अंतीसादरकरण्यातआलेल्या अहवालात दोन्ही जिल्हा शल्य चिकित्सक दोषी असल्याचे समोर आलंआहे. परिणामी एकाच वेळी आजी- माजी जिल्हा शल्य चिकित्सकांवर निलंबनाची कारवाई करण्यातआलीआहे.

Continues below advertisement

Kolhapur CPR News: नेमकंप्रकरणकाय?

दरम्यान, याप्रकरणीशिवसेनाठाकरेगटाचे उपनेते संजय पवार आणि सहसंपर्कप्रमुख विजय देवणे यांनी कार्यकर्त्यांसह सीपीआर मध्ये 8 डिसेंबर 2025 रोजी एक स्टिंग ऑपरेशन केलंहोता. यावेळी वैद्यकीय बिलांच्या फाइल्स मंजूर करण्यासाठी घेतल्या जाणाऱ्या पैशांच्या देवाण-घेवाणीची तारीखवार नोंद असलेली लाल वहीच सापडली होती. देशमुख या सहायक संचालक, आरोग्य सेवा परिमंडळ, पुणे येथे कार्यरत आहेत. दरम्यानयाप्रकरणाच्या दुसऱ्याच दिवशी नागपूर येथील हिवाळी अधिवेशनात बोटठेवतहेप्रकरणसमोरआणण्यातआलं. त्यावेळी सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी आरोग्य उपसंचालक डॉ. दिलीप माने, हिवताप विभागाचे सहायक संचालक डॉ. संजय रणवीर, सांगलीच्या सीएस कार्यालयातील दीपक वरक यांची चौकशी समिती नेमली होती. या समितीने 500 हून अधिक पानांचा चौकशी अहवाल फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात वरिष्ठांना सादर केला होता. त्यावर या दोन्ही वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या निलंबनाचा निर्णय घेण्यात आला. अनिल कुमेरीये, कार्यासन अधिकारी, सार्वजनिक आरोग्य विभाग यांच्या सहीचे याबाबत आदेश आहेत.

इतर महत्वाच्या बातम्या