मुबंई : सात महिन्यापूर्वी आरोपी आदित्य नलावडे एका अल्पवयीन मुलीला पळवून घेऊन गेला. लग्नाचे आमिष दाखवून आदित्य या मुलीला मुंबईमधून नांदेडला घेऊन गेला. पेशाने ड्रायव्हर असलेला आदित्य इतका हुशार होता की त्याने त्याचे सर्व नंबर, सोशल मीडिया अकाउंट्स बंद केले होते. जेणेकरून पोलीस त्याच्यापर्यंत पोहोचू नये. मात्र, इंस्टाग्रामवर एक फोटो टाकणं चांगलच महागात पडलं अन् आदित्य पोलिसांच्या जाळ्यात सापडला.


माटुंगा येथील एका नामांकित कॉलेजमध्ये अभियांत्रिकीचे शिक्षण घेत असलेल्या 17 वर्षांच्या अल्पवयीन मुलीला लग्नाचे आमिष दाखवून आरोपी आपल्यासोबत नांदेडला घेऊन गेला. तिथे आदित्य आणि अल्पवयीन मुलगी एकत्र राहू लागले. मात्र, अल्पवयीन मुलीच्या कुटुंबीयांनी माटुंगा पोलीस स्टेशन येथे ती बेपत्ता असल्याची तक्रार दिली. मुलगी अल्पवयीन होती, त्यामुळे प्रकरणाची गंभीर दखल घेत पालकांची तक्रार नोंदवून तपास सुरू केला. आदित्यने आपले सर्व नंबर बंद केले होते. पोलिसांना एकूण 24 नंबर मिळाले आणि या नंबरच्या CDR काढत पोलिसांनी तपास केला.


नोकरीचा ऑनलाइन शोध घेत असलेल्या गरजूंना लुटणाऱ्या दिल्ली येथील नकली कॉल सेंटरचा पर्दाफाश


तपास सुरु असताना पोलिसांना एक फोटो मिळाला. हा फोटो लोणावळा येथे काढण्यात आला होता. तो फोटो त्या मुलीकडून इंस्टाग्रामवर अपलोड करण्यात आला होता. फोटोच्या खाली इंस्टाग्रामचा ID होता आणि हाच एक धागा पकडत पोलिसांना आरोपीपर्यंत पोहोचण्याची वाट सापडली. फोटोवर असलेल्या इंस्टाग्राम आयडीचा नंबर आणि लोकेशन काढण्यासाठी पोलिसांनी केलिफोर्निया येथे असलेल्या इंस्टाग्रामच्या कार्यालयाशी संपर्क केला. त्यांच्याकडून इंस्टाग्रामसाठी वापरण्यात आलेला मोबाईल नंबर पोलिसांना मिळाला.


पोलीस नांदेडला पोहोचले, ज्या ठिकाणी आदित्य त्या मुलीला घेऊन राहत होता. पोलिसांनी शेवटी आदित्य नलावडेला नांदेडवरून अटक करत मुलीची सुखरूप सुटका केली. सदर गुन्ह्याचा तपास पोलीस उपायुक्त परिमंडळ 4 चे विजय पाटील माटुंगासह पोलीस आयुक्त भीमराव इंदलकर, पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विजय सिंह घाटगे, सहपोलीस निरीक्षक धीरज गवारे, पोलीस शिपाई संतोष पवार, राहुल चतुर, महिला पोलीस निरीक्षक सुनीता कांबळे या पथकाद्वारे करण्यात आला.


#Jalna #CrimeNews विधवा सूनेचे अनैतिक संबंध असल्याचा राग, सून आणि प्रियकराला ट्रॅक्टरखाली चिरडलं