कल्याण :  कल्याण पूर्व येथे एका तरूणीने आठ जणांनी मिळून केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली.  या प्रकरणातील आठ आरोपींच्या चार दिवसांची वाढ करण्यात आली असल्याची महिती वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी दिली आहे.


कल्याण पूर्वेतील अल्पवयीन तरुणीवर लैगिंक अत्याचार करुन तिचा व्हिडीओ व्हायरल करण्याची धमकी देण्यात आली होती. या मानसिक व शारीरिक अत्याचाराला कंटाळून तरुणीने इमारतीवरुन उडी घेऊन आत्महत्या केली होती. या प्रकरणातील आठ आरोपींना कोलशेवाडी पोलिसांनी अटक केली होती. त्यांची पाच दिवसांची पोलिस कोठडी संपुष्टात आल्याने त्यांना पुन्हा आज कल्याण न्यायालयात हजर केले असता त्यांच्या पोलिस कोठडीत आणखीन चार दिवसांची वाढ करण्यात आली आहे. 


सुरुवातीस हे प्रकरण आत्महत्येपुरते मर्यादीत होते. या प्रकरणी कोलशेवाडी पोलिसांनी सखोल तपास केला असता पोलिस तपासात तरुणीच्या मोबाईलमधील तिने तिच्यावर कशा प्रकारे अत्याचार झाला याच्या नोट लिहून ठेवल्या असल्याचे आढळले. कोलशेवाडी पोलिसांनी या प्रकरणात सात तरुण आणि एक तरुणीला पोलिसांनी अटक केली होती. अटक आरोपींना कल्याण न्यायालयात हजर केलं असता  त्यांना यापूर्वी पाच दिवसांची कोठडी मिळाली होती. या घटनेनंतर कल्याण शहरात एकच संतापाची लाट पसरली होती. पोलिस देखील या प्रकरणी सखोल तपास करत आहेत. दरम्यान आज आरोपींना पुन्हा न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्यांच्या पोलिस कोठडीत वाढ करण्यात आली असून चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. तसेच आरोपींच्या विरोधात सामूहिक बलात्काराचे कलम आणि आयटी अॅक्टची कलमे लावण्यात आली आहे. आत्तापर्यंतच्या तपासाअंती ही कलमे वाढविण्यात आली आहे. या घटनेचा सखोल तपास अजून सुरु असल्याचे कोळसेवाडी पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक बशीर शेख यांनी सांगितले .


संबंधित बातम्या :