Kalyan Crime : "तुम्ही मराठी माणस घाण आहात. तुम्ही मटण मच्छी खातात. तुमच्या सारखे मराठी माझ्याकडे झाडू मारायला आहेत", असं म्हणत एका अधिकाऱ्याने एका कुटुंबियांना मारहाण केल्याचा प्रकार समोर आलाय. कल्याण योगीधाम परिसरातील अजमेरा हाईट्स या हायप्रोफाईल सोसायटीत किरकोळ कारणावरून एमटीडीसी या विभागात अकाऊंट मॅनेजर पदावर कार्यरत असलेल्या अधिकाऱ्याने गुंडांना बोलावून मारहाण केल्याचा धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेत तीन जण जखमी असून एकावर मुंबईच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
अधिकची माहिती अशी की, MTDC मध्ये अकाउंट मॅनेजर असलेले अखिलेश शुक्ला आणि वर्षा कळवीकट्टे हे अजमेरा सोसायटीत आजूबाजूला राहतात. नेहमीप्रमाणे अखिलेश शुक्ला यांच्या पत्नी गीता या घराबाहेर देवपूजा करून धूप लावत असते. धूप लावल्यामुळे वर्षा कळवीकट्टे यांच्या घरात हा धूर जात असल्याने गीता यांना हा धूर घरात येऊन या धुराचा घरात असलेल्या तीन वर्षाच्या बाळाला आणि घरात असलेली वयोवृद्ध आई हिला दम लागतो. या धुराचा त्रास होतो असं सांगितलं. मात्र गीता यांनी वाद घालण्यास सुरुवात केली. हा वाद सुरू असताना बाजूला राहणारे अभिजीत देशमुख आणि त्यांचे भाऊ धीरज देशमुख यांनी वाद सोडवण्यासाठी मध्यस्थी करत वाद सोडवण्याचा प्रयत्न केला. देशमुख यांनी वाद सोडण्याचा प्रयत्न केला. याचा राग शुक्ला याला आला आणि शुक्लाने 10 ते 15 गुंडांना बोलावून देशमुख बंधूंना लोखंडी रॉड ने बेदम मारहाण केली.
या घटनेत अभिजित देशमुख गंभीर जखमी झाले असून त्यांना मुंबईच्या सायन रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले आहे. शुक्ला हे या सोसायटीत वादग्रस्त असल्याचे समोर आले आहे. अनेक मराठी माणसांना शुक्ला याने त्रास दिला आल्याचा आरोप सोसायटीतील नागरिकांनी केला आहे. तुम्ही मराठी माणसे घाण आहात तुमचा वास येतो. तुम्ही मास मच्छी खाणारे आहात असे बोलून मराठी कुटुंबावर हल्ला केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या घटनेत पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आलाय.
इतर महत्त्वाच्या बातम्या